Friday, 31 July 2015

Mr. & Mrs.

       पती -पत्नीच्या नात्यातली बांधिलकी , समतोल  परिस्थितीमुळे बदलू शकतो काय ? जर नात्यातले संतुलन बिघडणे परिस्थितीमुळे अपरीहार्यच  झाले तर ते कोणत्या टोकाला जाऊ शकते याची उत्तरे "Mr. & Mrs." या नाटकात मिळू शकतील  . 
       गतवैभव , प्रसिध्दी हरवल्यामुळे काम मिळत नसलेला कलावंत आणि नोकरी सांभाळून घर सावरणारी , पतीवर प्रेम करणारी पत्नी …. परिस्थितीमुळे निर्माण झालेले तणाव , अशा निराशामय वातावरणात आशेचा किरण बनून आलेला मित्र … त्याने नायकापुढे  ठेवलेली ऑफर … नैतिकता, अनैतिकता याच्या मानसिक आंदोलनातून परिस्थितीला शरण गेलेला नायक यातून नाटकाची कथा पुढे सरकू लागते . 
      मराठी रंगभूमीवर आज अनेक नवीन प्रयोग होत आहेत . रंगमंचावर स्क्रीनचा प्रभावी वापर करत , नाटकाची कथा वास्तवदर्शी सादरीकरणातून  रंजकपणे सादर  करण्यात आली आहे . 
          चिन्मय मांडलेकर , मधुरा वेलणकर अशी सशक्त कलावंत मंडळी , मराठी रंगभूमीवर वेगळा विषय , उत्तम सादरीकरण असल्यामुळे  नाटक शेवटपर्यंत खिळवून ठेवत . 


No comments:

Post a Comment