रात्रीचे बारा वाजून गेलेले . नेहमीसारखे दिवे गेलेले. चाळ रात्रीच्या काळोखात बुडालेली. रातकिडयांच संगीत काळोखच्या मृतप्राय प्रवृतीला जिवंतपणा देत असल तरी एक विचित्र सूर वातावरणात निर्माण झालेला. थंडीन रात्रही गोठलेली होती . अशा वातावरणात कोण बाहेर पडणार.
राजला आज डयुटीवरुन यायला उशीर झाला होता. आपल्याच धुंदीत होता तो . कधी एकदा घरी जाऊन पलंगावर पडतो अस झाल होत त्याला . तसा धष्टपुष्ट गडी. काळोख असला तरी सवयीन जिन्यावरुन पाऊल टाकत होता.
अचानक त्याने समोर पाहील. उदबत्तीसारखा मिणमिणता प्रकाश, दोन लाल ठिपके . स्वत:भोवतीच एका लयीत वर्तुळाकार वलये काढत होते . अन त्यामागे एक अस्पष्ट आकृती असल्यासारख जाणवत होत . बाकी खोल अंधार . अनपेक्षित होत त्याला ते . राज “कोण आहे” म्हणून विचारणार तोच हसण्याचा एक भेसूर आवाज रात्रीच्या शांततेला चिरत गेला. राज किंचाळला “कोण आहे” तो आवाज अधिक भेसूर झाला. आवाजाची तीव्रता वाढली . जणु त्याला खिजवण्यासाठी आवाज वाढत होता . अशा थंडीतही राजच्या चेहऱ्यावरुन घाम निथळू लागला. कोसळलाच तो . त्याच्या आवाजाने बाजूच्या घरातली माणस धावत आली . तो काय बरळत होता, काही समजत नव्हत . सर्वानी त्याला घरी नेल, पलंगावर झोपवल. त्याच बरळण कमी झाल नव्हत. दरदरुन ताप आला होता त्याला. कुणाला काहीच उमजेना काय झाल म्हणून. राजही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. भूतबाधा तर नाही ना ?काहींनी शंका व्यक्त केली. अशा घटनांत भूत वैगरे संकल्पना लगेच फेर धरु लागतात . बरळणे, भीती याचा मनोवैज्ञानिक दृष्टीतून विचार न होता, त्याला पारंपारीक भूताखेताच्या विचारातून तपासण्यात येत असल्यामुळे लगेच त्याला भूताने झपाटल अस निदान केल गेल .
सकाळ झाली आता राज बराच निवळला होता. बरळण कमी झाल होत. त्याने उलगडा केला “मी एक पांढरी बाई पाहिली रात्री !उदबत्या घेऊन असलेली !लगेच गायब झाली”. कुणाला काहीच कळेना. सगळे शांत. इतक्यात गोटयाने उलगडा केला . “अहो ती आपली शेजारची काळे काकू असणार! नेहमी रात्री उभी असते अशी ती! उदबत्या घेऊन! वेडी आहे ती”
No comments:
Post a Comment