जाती व्यवस्थेची पाळमूळ इतक्या घट्टपणे समाजात रुतली आहेत की , माणसाच्या जातीची ओळख करण्याकरिता त्याच्या नावाचा उपयोग केला जावा . अतिरेक म्हणजे त्यातूनही समाधान नाही झाल तर थेट जात विचारण्यापर्यंत मजल जावी . कोठून उगम झाला ? कस आल हे सर्व माणसाच्या डोक्यात? का मनुष्याला सामाजिक वेगळेपण जपावेसे वाटते? या प्रश्नांना काही वस्तुनिष्ठ उत्तरे मिळत नाहीत . लहान बालकाकडे पहा . त्याला पडतो का हा प्रश्न . त्याच्या नितळ निरागसतेने तो सर्वांनाच सहजपणे सामावून घेतो . समाजाला इतक्या सहजपणे सर्वसमावेशक धोरण स्वीकारणे जड का जावे? काय आड येते ?अहंकार … वर्षानुवर्षे बिंबवलेली सामाजिक असमता. या विचारधारेतून स्वतःला पटल तरी सामाजिक दबावामुळे विचार मुक्तपणे व्यक्त होत नाहीत. मग आचाराचे काय ?
हलक-फुलक या नाटकात या व्यवस्थेवर मार्मिक पद्धतीने बोट ठेवण्यात आले आहे . भिन्न जातीतील नायक(सागर कारंडे )-नायिका (अनिता दाते )यांच्या कथेतून सूत्रधार (भारत गणेशपुरे )नाटक पुढे नेतो .
नाटकात ३ पात्रे आहेत . तिन्ही कलाकार विविध भूमिका पार पाडतात . या भूमिका पार पाडताना त्या त्या character चे गुणविशेष सुस्पष्टपणे अधोरेखित होतात , हे या गुणी कलावंतांचे अभिनय कौशल्य आहे . खुमासदार संवाद , प्रसन्न व्यक्तिचित्रण यातून कथेचे सार नेमकेपणाने व्यक्त होते.
जातीव्यवस्थेचे पूर्णपणे निराकरण होण्यासाठी मानवतेची व्यापक भूमिका सहजतेने स्वीकारली जात नाही .अशा नाटकातून जो संदेश मिळतो त्यावर कितीजण वाटचाल करतात , यावर नाटकाचे सामाजिक यश अवलंबून आहे . व्यावसायिक यश तर नाटकाला मिळतच आहे .

No comments:
Post a Comment