Saturday, 2 January 2016

प्रेम हे मिळावे मला .

किती वाट पहावी , कसे कळावे मला
पाखरेही निघाली , किती छळावे मला

चेहरा ओंजळीतून निसटून गेला
विझलेल्या  ज्योतींनी  का जाळावे मला

आसवांना झालाय सराव वाहण्याचा
अवचित येशील कसे कळावे मला

श्वासही झाले  तुझे गुलाम आता
बेघर करून असे का गाळावे मला

याद येई अशी का होऊन काफिया
मृगजळ जरी प्रेम हे मिळावे मला . 

No comments:

Post a Comment