Saturday, 20 February 2016

PERFECT MISMATCH




                    प्राची   आणि जयंत एकमेकास अनभिज्ञ अशी भिन्न व्यक्तिमत्वं . प्राची बांधकाम कंपनीत कार्यरत तर जयंत एक बांधकाम कंत्राटदार आहे. दोघांमधला एकमेव सामायिक दुवा म्हणता येईल अस म्हणजे बांधकाम व्यवसाय . पूर्ण भिन्न प्रकृतीची माणसे . प्राची मुक्त विचारांची, मुक्तपणे जीवन जगणारी . तर जयंत रांगडा , सरळ आयुष्य जगणारा .  प्राचीला पुरुषांचा द्वेष . जयंत त्याच्या व्यवसायामुळे एकटा  राहिलेला . या कारणांमुळे दोघेही अविवाहित .  अशी दोन माणसे  एकत्र आली तर काय होईल ?  एकत्र येण्यासाठी perfect असण जरुरी आहे काय ?

                    perfect असणं म्हणजे नेमक काय ? याचा जर शोध घेतला तर काहीच सापडणार नाही . म्हणजे छत्तीस गुण वैगरे मिळणे अस जे काही असत ते किंवा perfect असण्याचा बुरखा पांघरून समाजाच्या दबावाखाली जगणारी जोडपी पहिली तर , perfect या शब्दाचा नेमका तळ  शोधावा लागेल . एकत्र राहणारी दोन माणस , मनाने एकत्र असतीलच अस नाही .  त्यांच्यात खटके उडत नसतील कदाचित . परंतु काहीतरी deformity असते  नात्यात . नाही जुळत नाती नैसर्गिकपणे.   भावनांच्या सूक्ष्म स्पंदनाचा नैसर्गिक आदर झाला नाही तर नाती तकलादू ठरू लागतात . योग्य , सुग्योग्य अस नसतच मुळी . नदी आणि समुद्र कुठे एक आहेत , तरीही नदी अनेक अडथळे पार करत समुद्रास भेटते . हे भेटण नैसर्गिक असत , उत्कट असत . कोणताही दबाव नसतो . समुद्रही नदीला तितक्याच उत्कटतेने सामावून घेतो . दोन व्यक्तिमत्व केवळ भिन्न प्रकृतीची आहेत म्हणून त्याचं मिलन होणारच नाही अस नाही . त्यांच्यात एक नैसर्गिक उर्मी , उत्कटता  असेल तर हे बंध प्रेमाच्या अदृश्य धाग्याने तरलतेने जुळले जातात . प्राची आणि जयंत दोन टोकाची व्यक्तिमत्व परंतु एक नैसर्गिक अदृश्य दुवा  त्यांच्यातल  अनामिक नात जुळवू पाहतोय .   बाहेरून खडबडीत वाटणाऱ्या नात्याची नाळ आतून जुळली जातेय . त्याला आवेग आहे केवळ नैसर्गिकतेचा . मग कोण रोखणार या प्रवाहाला ?

                प्राचीच,  पुरुषांचा द्वेष करण्याच कारण तिच्या बालपणात आहे . जयंत समोर येणार आयुष्य कवेत घेणारा तर याउलट प्राचीची आयुष्याबद्दलची संकल्पना आहे .ती त्यापासून दूर पळणारी, एकांताच्या नावाखाली  स्वतःला एका सुरक्षित कोंदणात जखडू पाहणारी .  प्राची कामाच्या धकाधकीतून एकांत मिळावा म्हणून  चार दिवस एका हॉटेलवर सुट्टी एन्जॉय करण्याकरिता उतरलेली असते . तिथे जयंतच काही बांधकाम सुरु  असतं . प्राचीच्या शांततेचा आणि सुट्टीचा रसभंग होतो . दोघांचे खटके उडतात अन मग एकत्र दारू पिण्यास बैठक मारण्याइतकी मैत्री होते. त्यानंतर दारूच्या नशेत एक अतर्क्य घटना घडते .   प्राची अस्वस्थ होते . त्या घटनेतून ते एकमेकाचा शोध घ्यायचं ठरवतात.  कसा शोध घेतात ? काय होते पुढे ? फिल्मी वाटावी अशी कथा आहे . त्यातलं फिल्मीपणच मजा  आणतं .    इंग्लिश चित्रपट " french kiss " , त्यावर बेतलेला "प्यार तो होनाही था "सिनेमा आठवतो .अशी मांडणी असलेले म्हणजे,  दोन अनोळखी व्यक्तिमत्व भेटणे त्यांच्यात प्रेम होणे  इ . अनेक सिनेमे यापूर्वी  येऊन  गेले आहेत . अशी घटना घडूच शकत नाही अस नाही . अतर्क्य वाटाव्या अश्या घटना घडत असतात . अस घडेल काय किवा नाही याचा विचार न करता नाटकाचा आनंद जरूर घ्या .


                   

No comments:

Post a Comment