Thursday, 10 March 2016

नातं

नात्याला ह्या काय नाव देऊ
तुझी रीत कळेना तुझी प्रीत कळेना
कसे  ओतू भाव कुंचल्यात
तुझा रंग कळेना तुझा ढंग कळेना

कसे उलगडू पदर मनाचे
तुझ्या मनीचा तळ गवसेणा
कृष्णविवरात हे एकले जगणे
किरण पोचेना  भाव उमगेणा

तू यावे वेळी अवेळी
मिठीत मी विरघळावे
वाराही निश्चल तुजवाचून
चाहुलीने त्यासही गीत सुचावे

एकांत माझा हा जीवघेणा
तुझ्या स्वप्नांनी मन डोलावे
स्वप्न वृथा जरी , आठवणीने तुझ्या
ओसाड जीवनात जल बरसावे

No comments:

Post a Comment