परदेशासारखी स्वच्छता आली तर
मला कस ओंगळवाण वाटेल
आपलं बर मातीत लोळण
कारण मला इथली सवय झालीय
थुंकू नको सांगणारा तू रे कोण
येडा की खुळा
पचापचा थुंकण मला बर वाटत
कारण मला इथली सवय झालीय
संस्कृतीचे गुणगान गायाचे
संस्कार मात्र विसरायचे
शिस्तीचे धडे परदेशात गिरवायचे
कारण मला इथली सवय झालीय
सवय झालीय मातीची
सवय झालीय अव्यवस्थेची
सवय झालीय कोतेपणाची
सवय झालीय झापडं ओढून घेण्याची
मला कस ओंगळवाण वाटेल
आपलं बर मातीत लोळण
कारण मला इथली सवय झालीय
थुंकू नको सांगणारा तू रे कोण
येडा की खुळा
पचापचा थुंकण मला बर वाटत
कारण मला इथली सवय झालीय
संस्कृतीचे गुणगान गायाचे
संस्कार मात्र विसरायचे
शिस्तीचे धडे परदेशात गिरवायचे
कारण मला इथली सवय झालीय
सवय झालीय मातीची
सवय झालीय अव्यवस्थेची
सवय झालीय कोतेपणाची
सवय झालीय झापडं ओढून घेण्याची
No comments:
Post a Comment