Tuesday, 13 December 2016

युटर्न -2

              




                      युटर्न -2 ही काळानुरुप बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या मेजर गिरीश वैद्य आणि रमाबाई गोखले या परिस्थितीने एकट्या पडलेल्या व्यक्तीरेखांची companionship  ची आवश्यकता प्रतिपादीत करणारी कहाणी आहे. 

                      नाटक सुरु होण्यापूर्वी  त्यांची पार्श्वभूमी पडद्यामागे सुरु होते.    मेजर गिरीश वैद्य घटस्फोटित तर रमाबाई गोखले, विधवा.  मेलर गिरीश वैद्य यांनी दिलेली companionship     ची जाहिरात वाचून त्या त्यास प्रतिसाद देतात व एक  वर्ष मुंबईत त्यांचे सोबत राहतात त्यांच्या या निर्णयाला मुलांचा आप्तांचा विरोध झाल्यामुळे रमाबाई पुन्हा पुण्याला परतात. 

             एक दिवस अचानक मेजर, रमाबाईचा दरवाजा ठोठावतात.  रमाबाई एकाच वेळी आश्चर्य, स्नेह, भीती  या संमिश्र भावनांनी प्रसंगाला सामोऱ्या जातात . .  इतक्यात मेजरना एका मित्राचा फोन येतो.  त्यांच्या एका मित्राच्या मुलाचा   युध्दात मृत्यू झाल्याची वार्ता त्यांना कळते.  बातमी ऐकून ते अस्वस्थ होतात.  तब्येत बिघडल्यामुळे रमाबाई त्यांना दवाखान्यात घेऊन जातात, त्यांची काळजी घेतात.  या निमित्ताने त्यांची जुनी companionship  सुरु होते.  रमाबाईच्या हदयातल्या कोमल भावनांना आता मेजरच्या धीर गंभीर स्वभावाची साथ मिळाल्यामुळे त्या अधिक खंबीर होतात.  त्यांच्या    companionship ला संस्कृती रक्षकांकडून होणारा त्रास त्या न डगमगता सहन करतात.
 
          बदललेल्या परीस्थितीत त्यांच्या मुलांचे विचार ही बदललेले असतात.  त्यांना त्यांच्या   companionship   ला आता काही आडकाठी नसते.  परंतु यामागे त्यांचा स्वार्थ असतो.  रमाबाईच्या मुलाला त्यांनी बाळंतपणासाठी अमेरिकेत याव अस वाटत.  मेजर त्यांना त्यांच्या मुलाचा स्वार्थ उघड करुन सांगताना स्पष्ट करतात यामध्ये आईचे प्रेम वैगरे काही नसून तेथे बाळंतपणासाठी मिळणाऱ्या आयांची कमतरता हे प्रमुख कारण आहे.  मेजर यांची मुलगी नवऱ्याशी बिनसल्यामुळे मेजर यांच्या मुंबईच्या घरी राहत आहे.  मेजर व रमाबाई यांच्या      companionship च्या चळवळीतून खूप प्रसिध्दी मिळत आहे.  त्यामुळे त्यांची मुले त्यांना लग्न करण्याचा आग्रह करत आहे. 

                मेजर व रमाबाई एका निरपेक्ष भावनेने एकत्र राहत आहेत.  त्यामुळे केवळ समाजाच्या दबावासाठी, आप्तस्वकियांच्या आग्रहासाठी मेजर यांना लग्न करणे पटत नसते तर रमाबाईंची मते वेगळी असतात .  पुढे काय होते जरुर पहा.


                companionship  गरज ही स्वाभाविक आहे.  परंतु आपल्या समाजावर पडलेला पगडा या संकल्पना सहजत: स्वीकारत नाही . याचे कारण म्हणजे आपण दुसऱ्याच्या आयुष्यावर प्रस्थापित केलेला हक्क.  जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं  एक स्वतंत्र जगणे आहे,  त्याचा एक परिघ आहे हे सहजपणे आपण मान्य करणार नाही तोपर्यंत या सहजभावनेचा विरोध मावळणार  नाही.  

No comments:

Post a Comment