जगणं म्हणजे वेड असतं
उडतात पक्षीही गगनात
गगनाला गवसणी घालण्याचं
खूळ असावं लागतं
जगतात मेंढरही
चरतात बकऱ्याही
जगण्याला जगावेगळं
परिमाण असावं लागतं
काय वेगळं जगलास
तुझं तूच ठरव
स्वप्नांचा केलास का पाठलाग
तुझं तूच ठरव
जगण्याच्या उन्मादाने
कधी भारलास का तू
निसर्गाचा गंध कधी
घेतलास का तू
जगण्याचा एक परीघ
रोजचा आहे
त्या परिघाला कधी
छेद दिलासा का तू
जगण्यासाठी न जगता
वेडा फकीर झालास का तू
जगणं म्हणजे वेड असतं
हा ध्यास घेतलास का तू
उडतात पक्षीही गगनात
गगनाला गवसणी घालण्याचं
खूळ असावं लागतं
जगतात मेंढरही
चरतात बकऱ्याही
जगण्याला जगावेगळं
परिमाण असावं लागतं
काय वेगळं जगलास
तुझं तूच ठरव
स्वप्नांचा केलास का पाठलाग
तुझं तूच ठरव
जगण्याच्या उन्मादाने
कधी भारलास का तू
निसर्गाचा गंध कधी
घेतलास का तू
जगण्याचा एक परीघ
रोजचा आहे
त्या परिघाला कधी
छेद दिलासा का तू
जगण्यासाठी न जगता
वेडा फकीर झालास का तू
जगणं म्हणजे वेड असतं
हा ध्यास घेतलास का तू
No comments:
Post a Comment