Monday, 13 February 2017

गुंफ तुझा आनंद

सरल्या क्षणांना कुणी पहिले .
जे उरले अंतरी ते भास सारे ..
दिसतात तारे,  चांदणे रुपेरी
जो क्षण जाणिवांचा
तो क्षण भरजरी  .

मृगजळ सारे , क्षणभंगूर सारे
न संपणारे सप्तरंगी  जाळे
अपेक्षांची  न संपणारी आशा
गुंफ तुझा आनंद
काळाला नसे परतीची दिशा

का लादले ओझे मनावर
का  उगा मन ते व्याकुळ
गोंजार तो दवबिंदू सुंदर
निसटेल बघ हा काळ
निसटेल दवबिंदूंची माळ





No comments:

Post a Comment