Saturday, 4 February 2017

Changing Lanes

           


           माणसांच्या शुद्र अहंकरापोटी त्यांच्या जीवनात केवढी उलथापालथ होऊ शकते.  यावरचा “Changing Lanes” नावाचा अप्रतिम सिनेमा नुकताच पाहिला. 

            एका प्रतिथयश  वकिल व सामान्य व्यसनाधीन विमा कर्मचाऱ्याची ही कहाणी आहे.  एकदा त्यांच्या गाडीला छोटासा अपघात होतो अन त्यांची पहिल्यादा भेट होते.  दैवाचे फासे कसे गूढ आणि विचित्र असतात, ते तुम्हाला कधी कुठल्या प्रसंगाला सामोरे नेतील याचे काहीच आडाखे बांधता येत नाहीत. 

          दोघांना त्याप्रसंगात एवढच करायच असतं, विम्याच्या क्लेमची औपचारिकता पूर्ण करणे.  परंतु वकिल महाशय घाईत असतात.  औपचारिकता टाळण्यासाठी ते त्याला चेक देऊ पाहतात.  विमा कर्मचाऱ्याची गाडी बंद पडल्यामुळे तो वकिलालामदत  करण्याची  विनंती करतो.  विमा कर्मचाऱ्याची कौटुंबिक न्यायालयात सुनावणी असते.  तिथे त्याने आपल्या कुंटुंबासाठी घर घेतलय हे त्याला सांगायच असतं.   परंतु वरील प्रसंगामुळे तो न्यायालयात वेळेवर पोहचू शकत नाही.  निकाल त्याच्या विरुध्द जातो.  तर  वकिलाची एक महत्वाची फाईल घटनास्थळीच राहते.  त्यामुळे तो न्यायालयात आवश्यक कागदपत्रं सादर करु शकत नाही. 

            प्रसंग छोटासा पुढे त्यांचे आयुष्य बदलवून   टाकणार असतो.  विमा कर्मचारी वैफल्यग्रस्त होऊन पुन्हा दारुच्या आहारी जातो.  वकिल त्याची फाईल मिळविण्यासाठी त्यांचे बैंक क्रेडिट रेकॉर्ड हॅकरकडून बदलतो ज्यामुळे त्याला कर्ज मिळण मुश्किल होते.  विमा कर्मचारी त्याच्या गाडीचे स्क्रू ढिळ करतो. मूळ समस्येतून मार्ग काढण्याऐवजी ,त्यांचे  अहंकारातून एकमेकावर कुरघेडी करणे सुरु होते.  कधी ते  समोरच्याचे आयुष्य  उध्वस्त करते तर कधी जीवावर बेतते.

            एक शुद्र अहंकार तुमची अवस्था प्राण्यापेक्षाही वाईट करते.  जीवनात अनेक कोडी संवादातून सुटू शकतात.  परंतु आपण हा संवादाच मीपणाच्या व्यर्थ बोथट कल्पनातून विसरतं आहोत.  तुम्ही स्वत:ला समजता कोण ? जरा डोळे उघडून पाहिले या अवकाशाच्या अफाटतेकडे , तर लक्षात येईल तुम्ही कणमात्र आहात.  मग हा कसला हा अहं तुमच्या आयुष्यात खळबळ माजवतोय.  कधी आत्मचिंतन केलयतं.  निसर्गासमोर तुम्ही दवबिंदू  आहात. कधीही ओघळू शकता.  निसर्गाने दिलेल्या शक्तीने तुमचे सूप्त गुण विकसित होईल.  परंतु निसर्गावर मात नाही करता येणार.  मग हा अहं कशासाठीसोडा त्याला खोल समुद्रात आणि आकाशाच्या भव्य पटलासमोर नतमस्तक व्हा.  स्वत: तील मी गाळून . संत / बुवा यांच्या प्रवचनातून हा अहं गाळण्याबाबत वारंवार सांगितलं जातं . परंतु आचरणात प्रत्यक्ष येत नाही कारण अनुभवातून येणाऱ्या परिस्थितीचे चटके बसलेले नसतात . दुसऱ्याचा अनुभव का होईना , सिनेमा स्वरूपात पाहताना जगणं सुंदर करण्यासाठी अहं गाळणे किती महत्वाचं आहे , हे उमजेल . नाहीतर अहं च्या जाळ्यात कायमचे गुरफुटून जाऊ . 
       

                                         Who are you
                                         Contemplate & discover
                                         Just a dot of infinity
                                                               
                                         Dissolve “I” in the loving sea
                                        Or wander aimlessly
                                        In the circle of me(ego )


                   

No comments:

Post a Comment