जगण्याचं सूत्र शोधताना अनेक संभ्रम मनात निर्माण होतात . जगणं शोधण्याच्या चिंतनात हेच तर जीवन आहे , हे ज्ञात होईपर्यंत आयुष्याची सांजवेळ जवळ येऊन ठेपलेली असते. निरंतरता हेच जीवनाचं साधं सरळ सूत्र आहे .आपण स्वीकारलेल्या मार्गावर कोणताही किंतू मनात न ठेवता मार्गस्थ होणे . कदाचित हा मार्ग इचछीत स्थळी नेणार नाही . दुसरा मार्ग आहेच . पुन्हा निरंतरता महत्वाची . या मार्गांची किती आवर्तन घडतील हे सांगता येणार नाही . मन किती वेळा विमनस्क अवस्थेत जाईल , मनाची आंदोलन , त्याचे सूक्ष्म बदल कितीतरी वेळा परिणाम करतील . या परिपक्व मार्गक्रमणातून जीवनाच्या धूसर दिशा स्पष्ट होऊ लागतील . मनावर दाटलेली संभ्रमांची जळमट दूर होऊ लागतील . या प्रवासात स्वतःवरचा विश्वास फार महत्वाचा आहे . वॉरन बुफे ,स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतःवरील विश्वासातून त्यांचं विश्व घडवलं आहे . वाटेवर येणारे खाच -खळगे ,प्रतिबंध ,प्रतारणा ही तर जीवनाचा अनुभव समृद्ध करणारी, नकारात्मकतेतून सकारात्मक ऊर्जा देणारी प्रेरणा आहे . तो जीवनाचा एक भागच आहे . किंबहुना त्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊच शकत नाही .
परिपूर्णतेच्या , सुखाच्या व्याख्या व्यक्तिनिरपेक्ष वेगळ्या असू शकतील. आजूबाजूच्या परिघात डोकावलं तर जाणवेल , प्रत्येकाच्या जीवन -परिघाची जडण -घडण जवळ जवळ सारखीच आहे . म्हणजे तेच नोकरी , बायको , मुलं ,त्यांचं शिक्षण त्यातून वेळ मिळाला तर मनाचं समाधान केल्यासारखं थोडं भ्रमण , सिनेमा वैगरे . अनेक जण या परिघात समाधानी असतात किंवा त्यांनी हेच आपलं प्रारब्ध म्हणून स्वीकारलेलं असतं . या मार्गक्रमणेत कदाचित वाट्याला काही वेगळेपण येणार नाही, परंतु कर्तव्यपूर्तीची भावना सुखावते . निरंतर चिंतनातून , नेहमीच्या परीघापेक्षा वेगळा मार्ग आत्मसमृद्धीकडे वाटचाल करताना जितका तावून सुलाखून निघेल तेवढं नेहमीच्या परिघात घडणार नाही कदाचित , शेवटी आत्मानंद महत्वाचा आहे . तुमचं सुख आणि आत्मसमृद्धी यातला नेमका भेद कळाला कि आयुष्य पारदर्शक , स्वच्छपणे दिसू लागतं . जीवनातील , परिपूर्णतेचा ध्यास तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गावर नेतो . संतांना विठ्ठलाची आस होती . आजच्या कालखंडात तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल यातून काय साध्य होणार आहे? आज अध्यात्म आणि विज्ञान यात सामान्य माणसांची कोंडी होते . त्याला नेमका सुवर्ण -मध्य साधता येत नसल्यामुळे , कुठल्यातरी एका चक्रात गुंतून जातो . अध्यात्म, धर्म हि समाजाला जोडून ठेवण्यासाठी आवश्यक रचना आहे , परंतु त्याचा अतिरेक झाला कि , सामाजिक असंतुलन जाणवू लागतं . सामान्य माणूस जास्त गोंधळून जातो .
अलीकडे एक प्रश्न विचारण्यात आला होता . भारतीय माणसं एवढे देव देव करतात , पूजापाठ करतात मग ते समाधानी का दिसत नाही , समाज समृद्ध , शिस्तबद्ध का दिसत नाही ? उत्तर फार मार्मिक आहे . प्रत्येक गोष्ट अध्यातत्मिकतेला जोडण्यामुळे भारतीय माणसांच्या मनात गोंधळ फार असतो . विज्ञानयुगातील संगणकाचीही पूजा केली जाते . विज्ञान आणि अध्यात्म याची फारकत करणच त्याला जमत नाही . सगळं देवावर सोपवलं कि संपलं आपलं कर्तव्य या दांभिक विचारामुळे निरंतर कर्माची आवर्तनचं घडत नाहीत .मोठे उद्योगपती , वैज्ञानिक यांना अध्यात्माची गरज भासत नाही? जरूर भासत असणार परंतु, निरंतर कर्म हा त्यांच्या विचारांचा स्पष्ट, स्वच्छ मूळ गाभा आहे . अध्यात्मातील कर्मकांड आणि निरंतर कर्मातील अध्यात्म यातील , कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या सूत्राला त्यांनी डोळसपणे स्वीकारत , कोणताही संदेह न बाळगता आयुष्याच्या दिशा निश्चित केल्या आहेत . हा संदेह मनात न उरणं , आपण निश्चित केलेल्या ध्येयाची जबाबदारी स्वीकारणं महत्वाचं आहे , परिणामांसहित .
मनुष्याचे वेगळेपण त्याच्या बुद्धीमुळे , कर्मामुळे अधोरेखित होते. दोन माणसांची बुद्धी वेगळी का असते यावर संशोधन सुरु आहे . वातावरणामुळे, संस्कारांमुळे थोडा फरक पडू शकतो . परंतु बुद्धी उपजत प्राप्त होते . उदा . रामाजुनम यांचा जन्म अत्यंत प्रतिकूल वातावरणात झाला परंतु त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवर काही परिणाम झाला नाही . आपल्या बुद्धीचा आवाका आपल्याला ज्ञात झाला कि आयुष्याचे मार्ग अधिक सुलभ होतात . माणसाचं सर्वात जास्त प्रेम स्वतःवर असतं . त्याला सद्सदविवेकबुद्धीचा संयमित आयाम प्राप्त होणे फार आवश्यक असते .स्वतःची क्षमता जोखून त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास महत्वाचा असतो . त्याला एक सकारात्मक निश्चित दिशा प्राप्त होते . एक बुद्धी आणि दुसरा आत्मानंद याचा सुयोग्य मेळ घालून आयुष्याची दिशा निश्चित केली कि गर्द अंधारातही जीवनाच्या परिपूर्णतेच्या अनुभूतीची जाणीव होऊ लागते .
सगळं तुम्हालाच ठरवायचं आहे . ठरवलं कि त्याचा स्वीकार करायचा आहे . तुम्हालाच ठरवायचं आहे ,
हसायचं कि रडायचं

तुम्हीच ठरवायचं
जीवनाचा सुंदर ताल
बेसूर काळ व्हायचं
जगायचं कि मरायचं
तिळतिळ तुटायचं कि
मुक्त वाऱ्याबरोबर वाहायचं'
तुम्हीच ठरवायचं
उंच अवकाशी झेपायचं
जमिनीवर रेंगाळायचं
जीवनाचा मुक्त प्रवाह व्हायचं कि
साचलेलं दिशाहिन डबकं व्हायचं
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार
घडवायचं कि बिघडवायचं
फुलवायचं कि कोमेजायचं
तुम्हीच ठरवायचं
No comments:
Post a Comment