Monday, 20 November 2017

खरं सांगतो एकट्याची कंपनी बोर नसते .

मला वाटलं एकट्याची कंपनी बोर असेल
पण ती तितकी कंटाळवाणी नाही जितकी वाटते
अवाजावी याचना नाही
कोणतीही  प्रतारणा नाही
आणि महत्वाचे म्हणजे अपेक्षाभंगाची चिंता नाही .
स्वतःच स्वतःला कुरवाळायचे  कारण स्वतःला दुखावणार कसे ?
स्वतःच स्वतःचे सांत्वन करायचे.

कल्पना करायची काल्पनिक परिघाची
ज्या परिघाचे राजे तुम्हीच आणि सर्वस्व तुमचेच
त्या राज्यात वावर असतो फक्त तुमचाच
आणि प्रत्येक घटनेचे नियंता तुम्हीच असता

मग माझ्या कल्पनेतून फुललेलं असो किंवा
 वास्तवतेच्या तुमच्या भूमिकेतून साकारलेले असो
निसटून गेलेला क्षण कोण मुठीत जपणार
किमान या जगातील प्रत्येक  क्षण माझाच आणि उश्वासही

प्रत्येक घटना माझ्याच  इच्छेचे प्रतिबिंब असते
माझं जग काल्पनिक असल तर काय झालं?
कुणी वास्तव जग दाखवू शकेल काय?
 सगळं मृगजळच तर  आहे

माझं जग माझं आहे, दवबिंदूची माळ
आणि आकाशातील तारकाही  माझ्याच
हे विशाल विश्व माझेच
आणि महत्वाचे म्हणजे मीही माझाच
सोबतीच्या आश्वासकतेसह , कायमचा
एका परिपूर्ण जगात , शांत निषादासह
खरं सांगतो एकट्याची कंपनी बोर नसते .


No comments:

Post a Comment