"देवा- एक अतरंगी " .....खरतर सतरंगी शीर्षक असायला हवं होतं . सर्वांना त्याच्यात गुंतवणारा पण स्वतः: कुणातही न गुंतता निर्मळ , निरपेक्ष , निर्व्याज्य प्रेम , मदतीचा हात देणाऱ्या एका मुक्त कलाकाराची ही कथा आहे . ज्याला प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगायचा आहे . प्रत्येक क्षणात त्याला आयुष्याचा उत्साह , चेतना , प्रेरणा अनुभवायची आहे . जीवनाचा प्रत्येक रंगात त्याला रंगायच आहे , समोरच्याच्या आयुष्यात सुखाचे रंग भरून . अलिप्तपणे तो जीवनाच्या रंगात रंगून निघाला आहे . जीवनातील छोट्या छोटया गोष्टींचं त्याला अप्रूप आहे . प्रत्येकाच एक विश्व असतं , कधी कधी ते आपल्याला उलगडत नाही . आपला आयुष्याचा नेमका दुवा हरवलेला असतो . त्या दुव्याची सांधणी तो मोठ्या कल्पकतेने करतो . प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरण्याचा त्याला जणू छंदच आहे . असे अनेक देवा आपल्या अवती भवती असतात . आपल्यापरीने प्रत्येक जण आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करतंच असतं . ते एक वेगळंच रसायन असतं . सर्वांपेक्षा वेगळं , "युनिक " "एकमेव "
" देवा " ची कथा एका वेगळ्या सादरीकरणातून उलगडत जाते . तेजस्विनी पंडित एक प्रसिद्ध लेखिका . दुसरं पुस्तक लिहिण्यासाठी तिच्यावर प्रकाशकांचा दबाव आहे . लिहिणं असं काही ठरवून होत नसतं . त्याकरिता एक आंतरिक प्रेरणा आवश्यक असते . घरातून तिच्यावर लग्नाचा दबाव असतो . अशा कोंडीत सापडलेली, मुक्त प्रवाहासारखं जीवन जगणारी लेखिका मैत्रिणीच्या सल्ल्यावरून कोकणातील एका निवांत ठिकाणी निघते . तिथे ज्या घरात राहते तेथे सापडलेल्या काही चित्ररूपी रेखाटनातून चित्रपटाची पटकथा उलगडत जाते .त्या चित्रातील चोर अन देवा एका घराच्या छपरावरून भयचकित नजरेने काहीतरी पाहत आहेत . त्यापुढे सर्व पानं कोरी आहेत . त्या रेखाटनावरून तिचं त्याच्याबद्दलचं कुतुहल वाढत जातं . त्या चित्रांवरून तिला जे काही दुवे हाती लागतात त्यातून मग पुढचा प्रत्येक दुवा शोधण्याचा तिचा प्रवास सुरु होतो .त्या चित्रातील चोर तिला एक दिवशी भेटतो अन तिला एवढाच कळतं ते दोघे आत्महत्या करणाऱ्या एका तरुणीला ( स्पृहा जोशी ) बघतात . देवा त्या तरुणीला त्यापासून रोखतो पण नंतर ते कुठे जातात हे त्या चोरालाही माहित नसतं . लेखिका त्या तरुणीचा शोध घेते का ? देवाला शोधण्याच्या प्रवासात लेखिका त्याच्यात गुंतत जाते , ती त्याला शोधते का ? आपल्या भावना व्यक्त करते का ? या सर्वांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल .
हा चित्रपट "चार्ली " या मल्यालम सुपरहिट चित्रपटाचा मराठी रिमेक आहे . अंकुश चौधरींने नेहमीच्या सहजतेने चित्रपटात रंग भरले आहेत . लेखिकेचा रोल मात्र स्पृहा जोशी यांना द्यायला हवा होता असं राहूनराहून वाटत . असो दिग्दर्शकाने काही वेगळा विचार केला असावा . तेजस्विनी व स्पृहा वास्तव जीवनातील मैत्रिणी आहेत . चित्रपटातील त्यांच्या नात्यात त्यामुळे एक सहजता जाणवतो . स्पृहा जोशी यांनी त्यांच्या वाट्याच्या भूमिकेत नेहमीच्या गंभीरतेने रंग भरले आहेत . भूमिकेतील संयतपणा गहिरा केला आहे . रीमा लागू यांची एक छोटी भूमिका चित्रपटात आहे . चित्रपटाच्या उपकथानकातून ती उलगडते . एकूणच चित्रपट जीवनाकडॆ एका वेगळ्या दृष्टीने पाहायला नक्कीच भाग पाडतो . आयुष्यातील रंग वेचत प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगायला शिकवणाऱ्या देवाचा हा चित्रपट जरूर पहा .

No comments:
Post a Comment