साल्साचं मूळ आफ्रो -क्युबन असलं तरी हा प्रकार अमेरिकेत develop झाला . काही संगीतकारांनी असं म्हटलंय की , साल्सा वैगरे असं काही नाही जे आहे ते क्युबन संगीत , कित्येक काळापासून वाजवलं जातंय . साल्सा फक्त बाटलीत मिळतो ( स्पॅनिश भाषेत साल्सा म्हणजे सौस , केचप . ) असे काही भौगोलिक विवाद असले तरी अमेरिकेत विकसित झालेला हा नृत्यप्रकार पुढे जगात लोकप्रिय झाला त्याच्या नॉस्टॅल्जिक करणाऱ्या संगीतामुळे आणि प्रवाही नृत्यशैलीमुळे . भारतात संदीप सोपारकर , kt , आनंद मुजुमदार यांनी हा नृत्यप्रकार रुजवण्यास पुढाकार घेतला आहे तसेच अनेक शिक्षक आपल्यापरीने त्याचा प्रसार करत आहेत .
साल्सा आता भारतात बऱ्यापैकी स्थिरावला आहे याच कारण या संगीताचं ८ बीट पॅटर्न . अनेक हिंदी , मराठी गाणी ही ८ बिट पॅटर्न मध्ये बांधलेली आहेत . त्यावर साल्सा नृत्य सहज करता येत . साल्सा म्युझिकचा आत्मा म्हणजे Clave पॅटर्न . स्पॅनिश भाषेत clave म्हणजे code किंवा key . आपल्याकडे गरब्याचे दांडे असतात त्याप्रमाणे लाकडाच्या दोन काठ्यांनी clave पॅटर्न निर्माण केला जातो. तुम्ही मूळ क्युबन संगीत ऐकलंत तर गाण्याच्या पार्श्वभूमीवर ठराविक अंतराने वाजणारे ठोके ऐकू येतील . हाच या संगीताचा आत्मा , या पॅटर्न भोवती संपूर्ण गाणं गुंफलं जातं .

शांतपणे हे music ऐकलंत तर लक्षात येईल पहिल्या मेजर मध्ये beats तीव्र असतात . ते तुम्हाला पुढच्या दिशेने जायला सांगत असतात . नंतर beatsची उतरंड सुरु होते . ते तुम्हाला मागे यायला सांगत असतात . साल्सा नृत्य याच थिम वर आधारलेले आहे . पहिल्या बीटवर डावा पुढे जातो. दुसऱ्या बीटवर उजवा पाय जागेवर अर्धवट वर उचलला जातो . (shifting of weight ) त्यानंतर तिसऱ्या बीटवर डावा पाय परत मूळ जागेवर येऊन चौथ्या बीटवर दोन्ही पाय जमिनीवर स्थिरावतात . मग पाचव्या बीटवर उजवा पाय मागे येतो . सहाव्या बीटवर डावा पाय जागेवर अर्धवट वर उचलला जातो .त्यानंतर सातव्या बीटवर उजवा पाय परत मूळ जागेवर येऊन आठव्या बीटवर दोन्ही पाय जमिनीवर स्थिरावतात . याच पॅटर्न ने हे नृत्य वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये केले जाते . या नृत्याच्या विशिष्ट अशा स्टेप्स नसून हे तुमच्या भावना , आत्मा याच्याशी निगडित असे सहज , सुंदर नृत्य आहे . फार महत्वाचे म्हणजे तुमचा पार्टनर आणि तुमचा भावनात्मक किंवा मैत्रीपूर्ण परिचय असेल तर हे नृत्य शिकायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही . यात पार्टनर च्या खुणा , पुढची स्टेप समजून घेणं आवश्यक असतं . उदा . तुमच्या पार्टनरला तुम्हाला उजवीकडे टूर्न द्यायचा आहे तर तो केवळ उजव्या दिशेने तुमच्या तळहातावर हलका दाब देईल , . त्याच्या अशा खुणा समजून नृत्याची रंगत वाढत जाते . परंतु तुम्ही mechanical पॅटर्नच्या मोहात पडलात तर या नृत्याचा आत्माच हरवून बसेल .
भारतात जास्त करून हिंदी संगीतावर साल्सा नृत्य केलं जात असल्यामुळे या संगीतातील clave , बेल , कॉंगो अभावानंच ऐकायला मिळत . clave तर या संगीताचा आत्मा आहे . clave चे बिट ओळखून त्याच्या rhythm वर एकरूप होणं म्हणजे एक नॉस्टॅल्जिक क्षण असतो . सर्वसाधारणतः साल्सा नृत्य पहिल्या बीटवर सुरु होते . परंतु माम्बो, न्यू यॉर्क स्टाईल साल्सा मध्ये ते दुसऱ्या बीटवर सुरु होते . म्हणजे पहिला बीट होल्ड करून दुसऱ्या बीटन सुरुवात करणं तसं अवघड परंतु एकदा का हे जमलं कि मग सांगीतिक समाधी लागते . हा प्रकार अमेरिकेत वृद्धिंगत झाला या न्यूयॉर्क साल्सा असंही म्हणतात . या प्रकारातील बादशहा म्हणजे एडी टोरीस . स्थानिक वैशिष्ट्यानुसार याचे वेगवेगळे जसे कि , न्यू यॉर्क स्टाईल , ऐले स्टाईल, क्युबन स्टाईल, मियामी स्टाईल असे प्रकार आहेत . या नृत्यातील प्रवाहीपणा , सहजता , नजाकत यामुळे ते कोणत्याही संस्कृतीत बेमालूम एकरूप होत .
साल्सा म्हणजे तुमच्या भावना प्रकट करण्याचं उत्तम माध्यम आहे . तुम्ही किती नृत्यकुशल आहात हे महत्वाचं नाही . तुमच्या जोडीदाराला समजून घेत संगीताशी एकरूप होणं , त्याचा आनंद घेणं महत्वाचं असतं . salsa मधील shine moves खूप रंजक असतात . आपल्या जोडीदारावर छाप पाडण्यासाठी shine स्टेप्स केल्या जातात . . आपल्या इथे बऱ्याचदा जोडीदाराबरोबरचे close pattern शिकवले जातात . त्यामुळे सोलो स्टेप्स तितक्याशा लोकप्रिय झालेल्या नाहीत . बराचसा भर जोडीदाराबरोबरचे pattern शिकण्यावर देण्यात येत असल्यामुळे shine च्या नजाकतीला मुकावे लागते . भारतीय पद्धतीत विकसित झालेला salsa खूप वेगळा आहे . स्थानिक रचनेनुसार बदलणे हेच salsa चं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल . फक्त salsa ला सुरुवात करा , जोडीदाराला समजून घ्या आणि बघा तुम्ही आपोआप शिकत जाल.

No comments:
Post a Comment