सकाळची कोवळी किरण येऊ दे ...
नैसर्गिक उर्मीने आली तर..
घर माझे भरु दे सोनेरी उबदार मायेने ..
माझी ना नाही..
भिजू दे मन माझे निसटणार्या दवांनीही...
तो त्याचा गुणधर्मच आहे....
माझी ना नाही...
पण नकोत ही मायावी नाती....
सोयीने उपजणारी आणि ...
सोयीने अंतर्धान पावणारी...
तळच सापडत नाही यांच्या अंतर्मनाचा...
कितीही खोल रुजवा भावना तरीहि...
का काही कळत नाही...
चेहरे यांचे सापडत नाहीत...
मुखवटे मात्र गोंजारतात..
तुमच्या द्विधा भावनांना ..
.अगदी सहज..गृहित असल्यासारखे...
तेव्हा आतून कितीही रडू आल तरीही
ओठावर हास्याची कसरत करताना..
खूप विचित्र दिसतो चेहरा ...
तेव्हा निराकाराकडे एकच
मागावस वाटत ...त्याची साथ...
कारण त्याच्याशिवाय हक्काने मागता येईल..
आणि हक्काने देईल असं सच्च कुणी नसतच..
अजय भोसले
नैसर्गिक उर्मीने आली तर..
घर माझे भरु दे सोनेरी उबदार मायेने ..
माझी ना नाही..
भिजू दे मन माझे निसटणार्या दवांनीही...
तो त्याचा गुणधर्मच आहे....
माझी ना नाही...
पण नकोत ही मायावी नाती....
सोयीने उपजणारी आणि ...
सोयीने अंतर्धान पावणारी...
तळच सापडत नाही यांच्या अंतर्मनाचा...
कितीही खोल रुजवा भावना तरीहि...
का काही कळत नाही...
चेहरे यांचे सापडत नाहीत...
मुखवटे मात्र गोंजारतात..
तुमच्या द्विधा भावनांना ..
.अगदी सहज..गृहित असल्यासारखे...
तेव्हा आतून कितीही रडू आल तरीही
ओठावर हास्याची कसरत करताना..
खूप विचित्र दिसतो चेहरा ...
तेव्हा निराकाराकडे एकच
मागावस वाटत ...त्याची साथ...
कारण त्याच्याशिवाय हक्काने मागता येईल..
आणि हक्काने देईल असं सच्च कुणी नसतच..
अजय भोसले
No comments:
Post a Comment