Showing posts with label देव आणि व्यवहार. Show all posts
Showing posts with label देव आणि व्यवहार. Show all posts

Thursday, 15 June 2017

देव आणि व्यवहार

माणसं येतात सुख ओरबाडायला
उरल त्यातून थोडं तर शिंताडायला
त्यांचा स्वार्थ दिसत असतो आरपार
तरीही हतबल करते जीवनाची धार

देवाच्या नावाने जागरण करणाऱ्या
मधाळ शब्दांचं जाळं विणणाऱ्या
देवाला गोंजारणाऱ्या अवगत असते ,
देव आणि व्यवहार यातली सीमारेषा

त्यांना माहित असतं कुठं थांबायचं
देवाच्या आडून स्वार्थ साधायचं
त्यांना नेमकं ठाऊक असतं
साध्या  मनांना गुलाम करायचं

तुम्ही फक्त बघता त्यांचा दिखाऊ देव
धावता वारी आंधळ्यासारखी ...
सांडून  शिक्षणाची पंढरी
गुंतता देवात ..... जरी  संत म्हणती  देव माणसात