Showing posts with label स्वर्गीय. Show all posts
Showing posts with label स्वर्गीय. Show all posts

Tuesday, 13 August 2019

स्वर्गीय

ते मंदिराच्या प्रार्थनेतही ताल  धरत होते ....
ते मंदिराच्या बांगेतही सूर मिसळत होते ...
ते चर्चच्या घंटानादानेही नतमस्तक होत होते ....
त्यांनी पोटासाठी दिलेली हाळी ..
षडजाच्या शुद्ध स्वरांपेक्षा स्वर्गीय  होती ...
कारण ...
ती पोटातून ... पोटासाठी ....
त्यांच्या चिमण्यांच्या किलबिलाटासाठी येत होती