Showing posts with label cry. Show all posts
Showing posts with label cry. Show all posts

Saturday, 15 October 2016

येत रडू....

येत रडू …. शास्त्रीजींचा साधेपणा अन नेते म्हणवण्यारांचा  उथळपणा पाहून … 
येत रडू …. मदर टेरेसांच प्रेम अन   प्रेमाच्या नावाने  चाललेला बाजार पाहून …
येत रडू …. आधी संसार नेटका ची शिकवण देणाऱ्या अन  "संत" म्हणवण्याऱ्यांनी मांडलेल्या उच्छादाला पाहून … 
येत रडू …. दृष्टीआड केलेल्या रत्नांकडे अन कृत्रिम झळाळीकडे धावणाऱ्या लोकांकडे पाहून … 
येत रडू … सोन्याचा धूर निघणाऱ्या  देशाच अन आता काळवंडलेल्या अवकाशाला पाहून …. 
येत रडू …. आमच्या हतबलतेकडे अन आमच्यासाठी घाव सोसणाऱ्या महापुरुषांकडे पाहून … 
येत रडू …. रडणाऱ्या डोळ्यांकडे अन थिजलेल्या हातांकडे पाहून ……