Showing posts with label ekatepana tips spruha joshi. Show all posts
Showing posts with label ekatepana tips spruha joshi. Show all posts

Monday, 29 May 2017

एकटेपणावर टिप्स



                      एकटेपणा आपल्या मनातून येतो . ह्याच्याशी  सामना  करण्यासाठी स्पृहा -जोशी यांच्या सोप्या टिप्स 

१)                    एकटं राहूच नका . आपल्या जवळ अशी माणसं पाहिजेत , असे  मित्र पाहिजेत , अशी खास दोस्त मंडळी पाहिजेत , ज्यांना कधीही भेटून आपल्या मनातलं सगळं काही सांगता येईल . त्यावेळी दुःखच सांगायला पाहिजे असं नाही . कित्येकदा आपला आनंद सुद्धा शेअर करायची गरज असते . पण या सगळ्या गोष्टी शेअर करण्याला आपल्याला त्यांना प्रत्यक्ष जाऊन   भेटायला पाहिजे . त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटा . त्यांच्याशी गप्पा मारा . तुमचा एकटेपणाही  कुठच्याकुठे पळून जाईल .

२)                खूप छान संगीत ऐका . म्युझिक आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या डिप्रेशन मधून बाहेर काढत . त्याचे खूप चांगले परिणाम आपल्यावर होत  कित्येक शास्त्रज्ञांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की , अगदी झाडापाशी तुम्ही छानसं   म्युझिक लावून ठेवलंत तर ती झाडं जास्त वेगाने आणि छान वाढतात .आपण तर माणसं आहोत .

३)               काहीतरी छान वाचा . पुस्तकांमधून छान गोष्टी आपल्याला कळतात . perspective जास्त मोठा होतो . कुठल्याही पद्धतीचं वाचन आपल्याला माणूस म्हणून grow करत असतं . खूप वाचत रहा
.
४)               आपण इतक्या  धकाधकीच्या आयुष्यात  असतो ,  शहरी लाईफ -स्टाईल  मध्ये असतो की , शांतपणा विसरून गेलेलो असतो . निसर्गाच्या जवळ जाण्याची गरज असते . छान ट्रिप्स प्लॅन करा . जास्तीत जास्त हिरवळ असेल , समुद्र असेल , छान नदी असेल अशा ठिकाणी जा आणि स्वतःला शोधायचा प्रयत्न करा .

५)                virtual , technical  गोष्टीपासून दूर रहा . technical , material गोष्टींपासून स्वतःला detach करा . फक्त आपल्या सोबत राहायचं .


                      याशिवाय माझ्या काही टिप्स

१)                  आवडणारे सिनेमे , नाटके पहा.  life is beautiful , titanic , changing lanes,   जिम केरीचे विनोदी चित्रपट , अमोल पालेकर -उत्पल दत्त चे विनोदी चित्रपट, चमेली कि शादी, टॉम आणि जेरी   सही रे सही , सौजन्याची ऐशीतैशी , ती फुलराणी असे मनाला उभारी देणारे , ताज-तवांन करणारे चित्रपट, नाटक मुद्दाम पहा .

२)                 नृत्य करा . कुठल्याही प्रकारचं नृत्य शरीराला , मनाला खूप आनंद देत . वयाची अट नाही . तुम्हाला आवडत ते नृत्य करा. just express yourself.
                     "करावके"  घ्या प्रोफेशनल असल्यासारखे गा . एकटेच गा . मित्र मंडळी , कुटुंबीय सोबत असतील तर अजून  धमाल  .  एकटेपणा    कुठच्याकुठे पळून जाईल .

३)                तुमच्यातील एखादी सुप्त , कलात्मक गोष्ट आवर्जून करा . कदाचित तुमची हस्तकला ,  चित्रकला , पाककला चांगली असू शकते . त्यातून काहीतरी निर्माण करत राहा . स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो . अगदी कागदाची बोट बनवून पहा . तुमची कला नेट वर सादर करत असाल तर likes  ची पर्वा करू नका . हे सर्व स्वतःसाठी आवर्जून करा . व्यक्त व्हा .स्वतःवर विश्वास ठेवा .काहीतरी सतत करत राहा . कदाचित काही गोष्टी अपूर्ण राहतील .आवडणार नाहीत . दुसरं काहीतरी सुरु करा . काहीतरी सतत करत राहणं , शोध घेत राहणं सोडू नका .

४)          एखादा दिवस फक्त लोळत राहा . मन करेल तेव्हा उठा . आवडेल ते करा . थोडा वेळ स्वतःचा शोध घ्या . काहीच  गवसलं नाही तर त्राण घेऊ नका . सरळ झोपून जा . आजचा, आताचा क्षण तुझा आहे . live it . Nobody can predict tomorrow . खूपच निराशा दाटून आली तर  त्यातून निघण्याचा मार्ग काढा . पर्याय नक्कीच असेल . त्यामुळे प्रयत्न नक्की करा . उद्या तुमचाच असू शकतो .

५)         एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने , फक्त असण्याने मनात खूप सकारात्मक भाव निर्माण होतात . ते कलाकार असू शकतात , मित्र असू शकतात , भूतकाळातील महान व्यक्ती असू शकतात .  जरुरी नाही ते आपल्या आयुष्यात हवेत . Just feel good by their existence somewhere , that makes you feel so positive . be  practical  .

           "लोपामुद्रा " हा स्पृहा जोशी यांचा कवितासंग्रह जरूर वाचा.  आयुष्य जगण्याच्या सर्व टिप्स त्यात सापडतील . आयुष्यात   कटू प्रसंग येत असतात . त्याने नाउमेद होऊ नका . तुमच्या आयुष्याचे गीत गात राहा . फोकस्ड रहा . स्पृहा जोशी यांच्या शब्दात ,


                     "कटू विखारी घाव जगाचे
                       मनात येता विरुनी जावे .
                       जगणे व्हावे इतके सुंदर
                      वेदनेतही गीत सुचावे "