Showing posts with label love. Show all posts
Showing posts with label love. Show all posts

Thursday, 10 March 2016

प्रेम

प्रेम नाही गफलत
प्रेम नाही मुताबत (अनुनय )
प्रेम आहे रदीफ (अन्त्ययमक )
 काफियाच्या(यमक ) मागोमाग येणारं

प्रेम म्हणजे बरकत
प्रेम म्हणजे  मिलकत
प्रेम म्हणजे सदाकत (सच्चेपणा )
प्रेम म्हणजे नजाफत (निर्मळपणा )


प्रेम नाही इनायत (मेहरबानी )
प्रेम आहे दियानत (सच्चेपणा )
प्रेम आहे जन्नत
मदहोश करणारं

प्रेम नाही मसलत
मनाशी मनाची कबुलत
फिर्याद एकच , तुझ्याशिवाय
आयुष्य रेगिस्तान  करणारंं


Monday, 4 January 2016

चारोळी :असफल मिलन

तोडावे का  बंध  हे
 असफल मिलनाचे
का नयन  विरोध  दावी
अव्यक्त मूक  मनाचे


Tuesday, 29 December 2015

चारोळी :उकल

माझी एकच  गोड तक्रार होती
भाव  का  माझे अनोळखी तुला
प्रेम का असे   उगी  दडवून…
हळूच  उकल करायचीस मला


Tuesday, 22 December 2015

तू नव्हतीस म्हणून काय दंगा केला

ढगही मुद्दाम गर्दी करून आले होते .                        
वाकुल्या करून आनंद जणू लुटत होते .
का  त्यांचा असा अघोरी डाव होता ,
 नेमका जेव्हा तुझा ठाव नव्हता .


भिजणारी पाखरेही मिश्किल हसत होती
उगाचच डोळ्यांना आज ती बोचत होती .
लाटांनीही का असा उच्छाद मांडला होता ,
मनातल्या तुफानानेही जेव्हा जोर धरला होता .

नभाला  ढगांची बरी साथ होती
येशील कदाचित उगीचच आस होती
तू नव्हतीस म्हणून काय दंगा  केला ,
एकटाच आसवांसवे  किनारा धुंडाळला .
   

Monday, 26 October 2015

प्रेमाने पोट भरत नाही

          सुकन्या एक गोड मुलगी . काही व्यक्तींबद्दल नेहमीच एक गुड फील वाटत तशी . हसतमुख , खळखळणारी . दु:ख  म्हणजे काय हा प्रश्न दु:खाला पडावा इतक सुख नेहमीच तिच्या चेहऱ्यात सामावलेले . वयाच्या त्या बेसावध वाटेवर ती प्रेमात पडली . नंतर भेटण नाही झाल .

              बऱ्याच काळानंतर सुकन्यासारखी एक मुलगी समोरून येताना दिसत होती . म्हणजे दिसत होती तिच्यासारखी पण चेहऱ्यावरचा सुखाचा ओलावा दिसत नव्हता . कोरडा चेहरा . ओळखीचा तरी अनोळखी . तिनेच हाक मारली . अरे सुकन्याच होती ती . खूप भरून आले . जवळच्या उपहारगृहात गेलो . निवांत बोलाव म्हणून . काय बोलावे ? कशी सुरवात करावी ? याचे आडाखे मनात बांधू लागलो . ती व्यक्त होण्याची  जणु वाट पाहत होती . कोसळली धबधब्यासारखी . 

                 " तुम्ही सगळे सांगत होता ते बरोबर होत . शिक्षण , करिअर याकडे आधी लक्ष द्यायला हव होत. काळाच्या ओघात उलगडणार प्रेम अनुभवेपर्यन्त संयम ठेवायला हवा होता . समुद्रकिनाऱ्यावरच्या चार भेटींनी माणसाची आणि आयुष्याची व्याप्ती नाही लक्षात येत . सगळे चांगल्या भावनेने समजावत होते. कळलच नाही . त्याचा पझेशिव  स्वभाव आवडायचा त्यावेळी .  प्रेमाचा कैफ होता . तो कैफ उतरला या वळांनी . मनावर खोल जखमा झाल्यात त्या वेगळ्या . बंधनात अडकायला मीच अधीर झाले होते , काहीच विचार न करता . माझ स्वतंत्र अस्तित्वच विरलय .  जगण्यासाठी शिक्षण , करिअर लागतच .  प्रेमाच्या धुंदीत  आयुष्याला आवश्यक गोष्टींकडे   दुर्लक्ष झाल . अशा वळणावर काय करायचं मग . प्रेमाने पोट  भरत नाही .इतर गरजाही असतातच ."