Showing posts with label marathi natak laginghai. Show all posts
Showing posts with label marathi natak laginghai. Show all posts

Tuesday, 11 August 2015

लगीनघाई

          आयुष्यभर आपल्या मुलांसाठी स्वतःच्या गरजा  बाजूला ठेवून फक्त त्यांच्याच सुखाचा विचार करायचा . स्वत:च्या सुखाची वेळ आली कि,  केवळ समाजाच्या भीतीपोटी आपल सुख झाकून ठेवायच. हे चित्र आपल्या समाजात काही नवीन नाही .

     विधुर झालेल्या पित्याने लग्नाचा पुनर्विचार करण , अजूनही सहजतेने स्वीकारलं जात नाही. त्यामुळे पिता आपले मनोगत मुलाला कसे सांगावे या चिंतेत पडला आहे . अशावेळी ,  मुलांन त्याच्याच लग्नाच मनोगत वडिलांसमोर ठेवल्यावर  भिडस्त स्वभावाच्या वडिलांची कशी कोंडी होईल . ही कोंडी सोडवताना काय धमाल होते . या    "लगीनघाई" ची मजा अशोक सराफ यांनी विनोदाची अफलातून वेळ  साधत खुसखुशीत   केली अहे. हे लगीन बघायची घाई जरूर करा . 



दिग्दर्शक -अद्वैत दादरकर