Showing posts with label marathi play shevgyachya shenga. Show all posts
Showing posts with label marathi play shevgyachya shenga. Show all posts

Monday, 10 August 2015

शेवग्याच्या शेंगा

              भारतीय संस्कृतीत live-in -Relationship ही संकल्पना तितकीशी रुचणारी नाही . याच कारण प्रत्येकाच एक स्वतःच जग असत आणि ते फक्त त्यांच  असल्यामुळे त्यात ढवळाढवळ करू नये , हे साधे शिष्टाचार आपण पाळत नाही. त्यांच्या वैयक्तीक गरजा असू शकतात , याचा विचार न करता ,  संस्कृतीच्या पगड्यामुळे समाज फार कोत्या नजरेतून स्वतःचीच मत लादून  परिस्थितीचे परीक्षण करत असतो . 

             उतारवयात एकाकी झालेल्या दोन व्यक्तींना त्यांची space मिळू नये का? ते सहवासाची अपेक्षा ठेवू शकत नाही का? एकमेकाच्या भेटीमुळे दोन व्यक्तींना आनंद मिळत असेल , आश्वस्त वाटत असेल तर समाजाच्या कलुषित दृष्टीकोनामुळे अशा दोन जीवांची घुसमट का व्हावी ?

            पत्नीवर प्रेम करणारे ससाणे (संजय मोने )व नवऱ्याच्या प्रेमाला , प्रामाणिकपणाला मुकलेल्या साठे (स्वाती चिटणीस )  …. जोडीदार गमावल्यामुळे एकाकी झालेल्या या दोन व्यक्तिरेखांची ही कथा आहे .त्यांच्या भेटीला "शेवग्याच्या शेंगा" निमीत्त  ठरत अन  एका निष्पाप नात्याला सुरवात होते .  या कथेला अजून दोन उपकथानकांची जोड देऊन तरुणवयीन , मध्यमवयीन , उतारवयीन तीन पिढ्यामधील नाते संबंध उलगडून दाखविण्यात आले आहेत . 

           नाटक, तीन पिढ्यांच्या आवर्तनातून फिरताना शरीरासक्ती , मानसिक गरज, प्रेम, आपुलकी , स्वार्थ अशा  जीवनातील अनिवार्य घटकांची मर्यादा व गरज स्पष्ट करत .  हलक्या-फुलक्या  व गंभीर प्रसंगाची गुंफण समतोल राखत केल्याने व तीन पिढ्यातील स्वभावविशेषांचे खुमासदार पद्धतीने सादरीकरण झाल्याने  नाटकातील  एक निष्पाप गोडवा शेवटपर्यंत रंगत आणतो . 


दिग्दर्शक-गजेंद्र अहिरे