आयुष्यात ज्या पुरुषाने मुलींवर impression मारण्याचा प्रयत्न केला नाही असा पुरुष कदाचीत हनुमानभक्त असावा किंवा त्याला स्वतःबाद्दल अति आत्मविश्वास असावा.अशा 'महान ' पुरुषांना वगळून इतर सामान्य पुरुषांबद्दल आपण बोलुया. impression मारण्याचे प्रकार वेगळे असले तरी सर्वांच उद्दिष्ट एकच .येनकेन प्रकारे मुलींना प्रभावित करणे.
प्रकार 1- शर्टाची दोन बटन उघडी ठेवू6न,भाड्याने आणलेली सोन्याची चेन,बाइक वागवत फिरणारी टोळी म्हणजे मानसशास्त्राचे तज्ञ. एकतर यांचा हात गळ्यातल्या चेनपाशी खेळत असतो नाहितर बाइकच्या ॲकसीलेटरशी . पूरुषांचा आक्रमक स्वभाव मुलींना आवडतो हा कुठूनसा केलेला अभ्यास,भले ते शाळेच्या अभ्यासात मागे असोत.
प्रकार 2- मुलींना साधी मुले आवडतात अशी धारणा असलेला दुसरा वर्ग.एकदम टापटीप. सद्वर्तनी. आता हा साधेपणा चेहरयावर खेळवायचा म्हणजे अतोनात कष्ट.कारण जे आडात नाही ते पोहरयात कुठून येणार?
असो असे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्व नमुने तुम्हाला परिचीत आहेत.आज या विषयावर एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे.बोधकथा ? या विषयवार...असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बोधकथेला कोणताही विषय व्यर्ज्य नसतो आपण फक्त बोध घ्यायचा.
आता हे पोरग कुठल्या प्रकारातल ते तुम्ही ठरवा.निघाल एक कुत्र घेउन impression मारायला.अर्थातच भाड्याचं. चांगल आडदांड .खरतर ते कुत्रच त्याला फरफटत घेउन चालल होत. या प्रकारातलया मुलांकडे हे कुत्र आळीपाळीने असे. फक्त अड्डा बदललेला असे. तर हे पोरग हजर एका अड्डयावर. यांना मुलीचा वास बरोबर येतो.म्हणूनच यांना ' वासू ' म्हणत असावे काय? pj होता...तर यांची घाणेंद्रीय शिकारी कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण. यांचा ऊपयोग सीमेवर शत्रूचा कयास घेण्यास चांगला होऊ शकतो.परंतु हा प्राणी गल्लीतच जास्त सापडतो.
पुढे काय झाल याची उत्कंठा तुम्हाला आहे ना... डावीकड़ुन उजवीकडे ,उजवीकडून डावीकडे त्याची मान वेध घेऊ लागली.शक्य असत तर 360 डीग्री कोनात त्याने वेध घेतला असता. इतक्यात हलका हलका मुलीचा गंध येऊ लागला.त्याची चुळबूळ वाढू लागली.गंध थेट नाकात आणि डोळयात घुसू लागला.पोरग बेफ़ाम. कुत्र बेफ़ाम.ते काही आवरत नव्हत.मुलगी खुदूखूदू हसत होती. impression मारायची हीच संधी.आपल कस ऐकतो तो हे त्याला दाखवयच होत त्याला. म्हणून त्याने कुत्र्याच्या डोक्यावर एक चपटी मारली आणि ऐटीत म्हणाला," ए गप्प बस ' . कुत्र्याची सटकली.तो थोडच त्याच ऐकणार.त्याचा मालक वेगळा.कोणतीही भीडभाड न बाळगता तो त्याच्यावर तुटून पडला.पोराची पळता भुई थोडी. कुत्र्याचा अवतार बघून मुलगी केव्हाच भुइला पाय लावून पळाली होती आणि कसाबसा तो मुलगाही.
बोधामृत ...मुलीला impress करण्यासाठी कुत्रा आणाल तर त्याला आधी नीट ट्रेनिंग द्या.
( मुली काय कशानेही प्रभावित होत नाहीत हे पुरुषांना कळत नाही तर कुत्र्याला बिचारयाला कसं कळणार.)
No comments:
Post a Comment