तुला आठवत का ग ते तळं..ती नौका ...
तूझ्याकडे खुळ्यागत पहात वल्हवणारा मी..
तूझ्या खळीत हरवलेला मी..
हिरव्यात हरवलेलं ते गुढ झाड...
सागराच्या लाटात मग्न तूझी तू ..
हळूच डोळ्याच्या कोन्यातून मला पाहणारी..
तूझी तू ...
ते एकले बेट आणि मला बिलगलेली तुझी तू..
तुझ्या ओठात मी...माझ्या ओठात तू...
पावसाच्या सरीसारखी येणारी अन दवबिंदूसारखी निसटून जाणारी तूझी तू...
अस बरच काही....
मनकोन्यात साचलेलं मळभ तसच दाटून रहात....
तुला बरचं काही सांगायच तसच
राहून जात...
मावळतीचे ते क्षण...चांदण...तांबड..तळ
अस बरच काही ...
अन बरचस काहीही नसलेलं..
खुळ्यागत ..
तूझ्या मौनात विरघळून जात ...
तेव्हा उमजू लागतं राधेचं मौन आणि मौनातील विरह ...
तूझ्या डोळ्यातील अव्यक्त पाणी माझ्या डोळयात साठून रहातं ...
कुठूनसे येणारे बासुरीचे सूर करु लागतात बेचैन ...
कसं सांगू तुला...सांगायच बरच काही असत ...तसच राहून जात...
बरचसं काही डोळ्यातून नकळत वाहून जात...
No comments:
Post a Comment