Showing posts with label नकळत. Show all posts
Showing posts with label नकळत. Show all posts

Sunday, 22 September 2019

नकळत


तुला आठवत का ग ते तळं..ती नौका ...
तूझ्याकडे खुळ्यागत पहात वल्हवणारा मी..
तूझ्या खळीत हरवलेला मी..
हिरव्यात हरवलेलं ते गुढ झाड...
सागराच्या लाटात मग्न तूझी तू ..
हळूच डोळ्याच्या कोन्यातून मला पाहणारी..
 तूझी तू  ...
ते एकले बेट आणि मला बिलगलेली तुझी तू..
तुझ्या ओठात मी...माझ्या ओठात तू...
पावसाच्या सरीसारखी येणारी अन दवबिंदूसारखी निसटून  जाणारी तूझी तू...
अस बरच काही....
मनकोन्यात साचलेलं मळभ तसच दाटून रहात....
तुला बरचं काही सांगायच तसच
राहून जात...
मावळतीचे ते क्षण...चांदण...तांबड..तळ
अस बरच काही ...
अन बरचस काहीही नसलेलं..
खुळ्यागत ..
तूझ्या मौनात विरघळून जात ...
तेव्हा उमजू लागतं राधेचं मौन आणि  मौनातील  विरह ...
तूझ्या डोळ्यातील अव्यक्त पाणी माझ्या डोळयात साठून रहातं ...
कुठूनसे येणारे  बासुरीचे सूर करु लागतात  बेचैन ...
कसं सांगू तुला...सांगायच  बरच काही असत ...तसच राहून जात...
बरचसं काही डोळ्यातून नकळत वाहून जात...



Saturday, 20 August 2016

नकळत

तुझं पाहिले मिठीत
चित्र विरले नकळत
माळ आठवणींची तुझ्या  .....
तुटली माझ्या नकळत

नाते दोघांचे दोघांसाठी
का धूसर उरले ...
ठेऊन पोकळी अनंत  .....
स्वप्न  सरले नकळत

तुझ्यासाठी होते   गं
चांदण्यातले  विहरणे
सांडून  प्रकाश मागे .....
उरला अंधार नकळत

ना कळले मला
न कळले तुला
घट्ट बंध हृदयाचे  .....
 क्षीण झाले नकळत