Showing posts with label i want to spek. Show all posts
Showing posts with label i want to spek. Show all posts

Monday, 17 July 2017

मला बोलायचं आहे

 मला बोलायचं आहे
आत खदखदणार सर्वच
कण कण तुटणार सर्वच

झाला  उद्रेक तर होऊ दे
आलं  वादळ तर येऊ देत 
तुटली मन  तर तुटू देत

वाहिले अश्रू तर वाहू देत
फुलले निखारे तर फुलू देत
झाले पाश मुक्त तर होऊ देत

नकोय मला धुमसणार मन
नकोय मला आत्माहिन  तन
नकोय मला अपेक्षांचं दडपण

मला मुक्त , व्यक्त व्हायचंय ,
समाजाने लादलेल्या विचारातून
स्वतःशी होणाऱ्या प्रतारणेतून

म्हणून मला बोलायचं आहे