सेल्फी बाहयरुप
दाखवू शकते. आतले गहिरे, गुंतागुंतीचे स्वरुप
नाही. स्त्री
मनाची घुसमट हा संस्कृतीच्या
पगडयामुळे निर्माण झालेला
तसा जुनाच प्रश्न. प्रगती
,स्त्री-शिक्षण
इ. बाबीतून
समाजात विशेष फरक पडलेला नाही, हे आजही निदर्शनास येत. स्त्रीला तिच्यावर लादलेल्या
कार्यसंस्कृतीतून स्वत:च्या
मनाशी संवाद साधण्याइतकाही
वेळ मिळत नाही.
इतरांशी
व्यक्त होण्याइतकाही. मग सुरु होते घुसमट . अशावेळी
समाजातील वेगवेगळया स्तरातून
आलेल्या पाच जणी रेल्वेस्टेशनच्या
लेडिज वेटिंगरुममध्ये एकमेकाच्या
संपर्कात योगायोगाने येतात.
जणू
आपल मनोगत व्यक्त करण्यासाठी
आपल्या मनातली घुसमट रिती
करण्यासाठी.
स्वाती
कवठेकर व्यवसायाने नर्स,
रोखठोक
बोलणारी कडक शिस्तीची बाई.
रोखठोकपणा , तिच्या शब्दांचे ओरखडे उमटावेत
इतका. त्यामुळे कुंटुंबापासून काहीशी दुरावलेली.
विभावरी
ही इंग्रजीची प्राध्यपिका.
भ्रष्ट, अस्थिर, विवेकशून्य जगात मुलाला का लोटायच,
असा
तिच्या पतीचा दृष्टीकोन . त्यामुळे अपत्य जन्माला घालू नये हा
विचार समाजाच विदारक सत्य समोर मांडतो . अंर्तमुख करतो. ती तिच्या
नवऱ्याशी सहमत असल्याचे दाखवत
असली तरी तिला मातृत्वाची ओढ
आहे.तर शाल्मली प्रधान हि कलावंत , व्यवसायाची
गरज म्हणून मातृत्व नाकारतेय.
तेजश्री ही गृहीणी नात्यामध्ये सुख शोधण्यात , नातीच बदलतेय. तर मीनाक्षी नात शोधण्यात
अपयशी ठरल्याने एकाकीपणाला
कंटाळून आत्महत्येच्या
निर्णयाप्रत आलीय.
पाच
वेगवेगळे समाज घटक परंतु एक
समान धागा म्हणजे सगळेच अव्यक्त.समाजाने लादलेल्या बंधनातून
त्यांची स्वतंत्र व्यक्तीमत्वे
आकार घेऊ न शकल्याने घुसमटतायत. त्यांना व्यक्त व्हायला स्पेस मिळते ती वेटिंग रूमची . तेथूनच त्यांच्या अंतरंगाचे पदर उलगडत जातात .
सर्व पात्राचे अभिनय सहज अन
नैसर्गिक आहेत.
अधिक
गुंतागुत न करता सहजसुलभ सादरीकरणातून
नाटय रंजकपणे सादर करण्यात आले आहे. त्या व्यक्त होतात का? त्यांच्या आयुष्यातील गुंतागुंत सुटते का ? मीनाक्षी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाटकात मिळतील .
दिग्दर्शक अमित भुरे
No comments:
Post a Comment