अलीकडेच पन्नास वर्षाचा झालो. आमच्या 50 + clubमध्य्ये मग पन्नाशीवर गप्पा रंगू लागल्या . सगळ्यांचा सूर एकच होता आता तरी निवांतपणे आवडीच्या क्षेत्रात वेळ गुंतवावा.म्हणजे नेमक काय कराव कळत नव्हत?. याबाबत कधी आत्मचिंतन केलचं नव्हत. या वर्गात जीवनाच्या एकसूरीपणाला सरसावलेला एक वर्ग असतो आणि तो बहूसंख्यांक असतो .तो प्रथम जबाबदारया आहेत रे, नाहितर मी याव केल असत ... म्हणत काढता पाय घेतो. यासाठी त्याला दोष देता येणार नाही.लहानपणपासून मराठी घरात सुरक्षित कोषाचे संस्कार झालेले असतात .म्हणजे नोकरी ,लग्न,मुल आणि पुढच्या पिढीच पुन्हा तेच.मला वाटत अल्पसंख्याक समाज जास्त प्रगती करतो.कारण प्रश्न अस्तित्वाचा असतो.उदा .ज्यू , पारशी , ब्राम्हण.
आजूबाजूच वातवरण, तीव्र इच्छाशक्ती तेवढचं महत्वाचं. पन्नाशीचा हाही एक भोज्या आहे, आपण बोलतोच जास्त.
तर , सोनालीताईने गप्पाच्या ओघात "पन्नाशीचा भोज्या ' या पुस्तकाचे नाव सुचवले.तिने सुचविले म्हणजे खासच असणार, हे गृहीत धरुन लगेच जवळच्या आणि आमच्या विभागात एकमेव असलेल्या मराठी पुस्तकाच्या दुकानात चौकशी केली. त्यापूर्वी नेहमीसारखी आजची पिढी वाचत नाही याची खंत व्यक्त झाली ,माझ्या पुस्तक वाचनाच कौतुक झाल .आठवडाभरात पुस्तक मिळण्याची ग्वाही मिळाली.पण दुसर्याच दिवशी पुस्तक उपलब्ध झाल्याचा फ़ोन आला.
पुस्तक हातात आल की मी आहे त्या अवस्थेत चाळायला सुरुवात करतो. भुरुभुरु पाऊस पडत होता. जराही वेळ न दवडता जवळच्या चहाच्या टपरीवरच बस्तान मांडले.'पन्नाशीचा भोज्या ' हा भूतकाळातल्या आठवणी आणि संवेदना जाग्या करणारा एक खजिना आहे, पुस्तकाची थोड्कयात ओळख वाचली. माझ्यासारखा वाचक त्यावरुन पुढे पुस्तक कस वाचयच ते ठरवतो.मनोगत वाचता वाचता पुस्तकात हरवून गेलो.भारतीय खेड्यात दिवसाचे तास खूप असतात, तेथल्या शुध्द हवेने माणूस घाबरायला लागतो अशी साधी, सरळ उपमांची अतिशोयक्ती नसलेली वाक्ये मनाचा ताबा घेऊ लागली. नुकताच गावची शुध्द हवा शरीरात साठवून आल्यामुळे असेल कदाचीत. वाचता वाचता आठवाणीच्या हिंदोळ्यावर डूलायला लागलो.मी , चहा आणि पन्नाशीचा भोज्या .मिलते जब तीन यार.वाचनाची मैफल तेथेच रंगली.
पन्नाशी म्हणजे तारुण्याच्या थोडी अलिकडची आणि बरीच पलीकडची धुसर सीमारेषा.आनंदमय स्वप्ने पाहण्याचा काळ. दिवा विझता, विझता कीटकांची जशी तडफड सुरु होते तशी तडफड सुरु होण्याचा काळ,अंकल हा शब्द शिवीसारखा कानाला झोंबनरा हा काळ.इथेच साला संघर्ष सुरु होतो.तारुण्य आणि कारुण्य याच्या सीमारेषेवरचा.आमच्याच वयाची पोर अंकल म्हणतात तेव्हा हा शब्द रुतून रहातो काट्यासारखा .अगदी पहिल्याच लेखात वर्मावर बोट ठेवल्यामूळे आठवणी भळाभळा व्हावू लागतात.
हे पुस्तक वाचताना आत्मचरित्रातमक वाटते.परतू त्या आठवणी आहेत 61 ते 80 या काळातील.मागची पिढी , पुढची पिढी याचे त्या त्या काळातील वर्तन , संस्कार , उद्दीष्ट याचा लेखाजोखा म्हणता येइल अशा. हा काळ थोडासा माझ्या काळाशी जवळचा असल्यामुळे माझे कुतुहल चाळवले. काही आठवणीत साम्य होते उदा. मराठी माध्यम, tv,खेळ ई. परंतु ज्या वातावरणात लेखक वाढला ती श्रीमन्ती सर्वानाच लाभत नाही.पैश्याची श्रीमन्ती नव्हे तर intelectual, कलासक्त श्रीमन्ती. घरातील स्त्री सुशिक्षीत असेल तर संपुर्ण कुटुंब सुशिक्षीत होते, फुले म्हणत.पुढच्या पिढीच्या जडणघडणीचा पाया इथेच रचला जातो.लेखकाच्या विश्लेषणात्मक शैलीतून ते जागोजागी अधोरेखीत होते .
खरतर 50 नंतर होणारया chemical लोच्याबाद्दल हे पुस्तक असेल अस वाटल होत. फक्त हा उलट प्रवास आहे.आठवणीचा धांडोळा घेण्याचा.50 शी ची वाट न बघता तुम्ही वेळीच नियोजन केल पाहिजे. अच्युत गोडबोले यांच्यासारखं. त्यांनी एक दिवस नोकरीच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला आणि सुरु झाल एकापाठोपाठ एक पुस्तक प्रकाशीत करणं.हे एका दिवसात झाल नव्हतं.त्यामागे नियोजन होत कित्येक वर्षाच. ही नियोजनातमक समज पुस्तक वाचता वाचता यायला लागते.भोज्याचा प्रश्न हळुहळु सुटू लागतो.
काही वेडी माणसं झाडं तोडू नये म्हणून आंदोलन करतायेत.वडाचे पार वाचल्यानंतर, ते का आवश्यक आहेत याचे आणखी एक उत्तर उलगडत जाईल. झाडे oxygen देतात आणि माणस झाडावर नाही आपल्या पायावर कुर्हाड़ मारुन घेतात.कारण आपण इवल्या डोळ्यांनी पहात असतो.जगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलात असते आणि सापक्ष असते.
नाव , शाळा, लग्न , नोकरी हे मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या जीवनातले चार टप्पे असल्याचे सांगतो .मी याला झोपणे , उठणे, हगणे, जाणे असे सर्वसाधरण चार टप्पे मानतो. पन्नाशीच्या या टप्प्यावर ध्येयहीन , आदर्शहीन , तत्वहीन जगण्याच्या प्रश्नाने , भोज्या तीव्रतेने जाणवू लागतो. यातील लेखकाने सांगितलेला लग्न हा भाग रतिसुख मिळवण्याचा एकमेव मार्ग होता हे परखड सत्य आजच्या पिढीला कदाचीत हास्यास्पद वाटेल. याबरोबर पहिला स्पर्श, तारांबळ याची आठवण होऊन मी आतल्या आत हसत होतो.आतल्या आत कारण अजूनही धोतरातले संस्कार पुर्णपणे पुसले गेलेले नाहीत.
हिन्दी भाषेवरुन सध्या जो गदारोळ सुरु आहे त्यावर भाष्य करण्यापूर्वी एक मिनिटाचे परिणाम जरुर वाचावा.ज्या भाषेमुळे 'मी' आहे, व्यक्तित्व आहे त्याचा अभिमान बाळगण्याबद्दल,लेखक मातृभाषा आणि तुमची वैचारीक जडणघडण वैगरे जड शब्द न वापरता ओघवत्या शैलीत सहज सांगतो.
अमेरिकन नागरीकत्व मिळवताना आपल्या पुर्वीच्या देशाच्या निष्ठेचा त्याग करावा लागतो.तशी शपथ घ्यावी लागते.आजची पिढी ते करतेही व्यवहार्थ आहे म्हणून.कदाचीत त्याच्या दृष्टीने निष्ठाही लवचिक असू शकते.तत्व , निष्ठा , व्यवहार यावर लेखक दोन काळातील उदाहरणांनी प्रकाश टाकतो. प्लास्टर औफ़ पेरिसचा गणेश आणून पर्यावरणाबद्दल बेफिकीर असणारी पिढी, अमेरिकेतील पर्यावरण पुरक मातीचा गणेश तेथील शिस्त याबद्दल बोलताना मात्र थकत नाहीत.
मुलींचा विषय निघाला की कुठल्याही वयात चित्तवृत्ती प्रसन्न होतात.मित्रांचे फड जमले की मोजदाद सुरु होते.अगणित dating करणारया त्या फ़्रैंच मुलाकडून तर आम्ही गंडा बांधून घेतला असता.पण त्याच्या देशात हे सर्व नॉर्मल आहे. सगळच सापेक्ष. आईनस्टाईन ची thoery of relativity थोडी थोडी कळू लागते.
अजून बरच काही आहे धर्म, राजकारण , अर्थशास्त्र, साहित्य...विस्तारभयास्तव सर्वच लिहित नाही.मला वाटत एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेला हा ठेवा आहे.त्याच चिंतन करायच आणि सुपूर्द करायच पुढच्या पिढीला . पण नेमक काय हवय आता आपल्याला चांद्रयान की... शाळा, वीज, संडास ,रस्ते, झाडं, पाणी ...हे समजावून सांगण्याची जबाबदारी पालकांची आहे नाहीतर आजची पिढी आम्हाला विचारुन जन्म दिलात का? अस विचारायला कचरणार नाही.योग्य वयात योग्य संस्कार रूजवण्याची आवश्यकता काय ,हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येईलच. सध्यातरी मला एवढच म्हणायच आहे ....(पन्नाशीच्या भोज्याच सार )
मला जाती , धर्म ,वंश यापलिकडे जगायचे आहे
हे समाजा, मला मुक्त आभाळी विहारु देशील का ?
तुझ्या जगण्याचा परीघ तू जग...
मला माझ्या परिघात स्वातंत्र्य उपभोगू देशील का ?
तू म्हणशील याला स्वैराचार करायचा आहे .
नाही ..... मला संविधानाला जपायचे आहे .
त्यानेच दिलेले मूलभूत स्वातंत्र्य , समता अंगीकारून
खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायचे आहे ..
हे समाजा मला तुझ्याकडून जास्त काही नको
एक माणूस म्हणून माझी ओळख राहू दे
एक माणूस म्हणून मुक्त वावर करू दे
जगाच्या सु -बदलाचा भागीदार मला होऊ दे .
तू तुला न उकलणाऱ्या नियमांत बांधले आहेस
त्याचे अर्थ उलगडण्याचे हक्कही रांधले आहेस
मी काय म्हणतो, बदलाची झळ पोहचेपर्यंत
तू तुझ्यात मस्त रहा , मला माझ्यात व्यस्त राहू दे
मला नाही रे बळ छोट्या गोष्टीत वाद घालायचे
देव्हारा कुठे बसवायचा यासाठी तीळ -तीळ भांडायचे
मला एवढंच माहित तू माणूस , मी माणूस..
तू तूझ्यात मस्त रहा, मला माझ्यात व्यस्त राहू दे...
आजच्या मुलांनी आठवणी लिहिल्या तर ते कशा लिहितील याबद्दल लेखकाला कुतुहल आहे.आजची पिढी लिहिते आहे नाही अस नाही.fb वैगरे वर.ते आपले शब्द जपून ठेवते वस्तू नाही. fb तुम्हाला ठराविक काळानंतर आठवणी दर्शविते.पण संदर्भ लागत नाही.हे संदर्भ आपण आजूबाजूच्या अवकशातून घेत असतो.पण अवकाशच सिमीत झाल्यवर संदर्भ लागणार कसे याचे अप्रुप मलाही आहे.अवघे 21 वर्षाचे आयुष्य जगलेल्या गौरी पाटीलचे 'दोन क्षणसुद्धा' आभाळाएवढे आहेत.पण ती कथा वेगळी आहे.अपवादात्मक.
लेखकाने साध्या सोप्या शब्दात आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.हा खजिना आपल्या पुढच्या पिढीकडे देण्याची जबाबदारी आपली आहे. माझे मित्र आता हे पुस्तक वाचायला मागतील आणि मी त्यांना देणार नाही हेही त्यांना माहित आहे.कारण लेखक अमाप मेहनत घेत असतो.त्याच्या प्रतिभेला दाद ही मिळालीच पाहिजे.स्वनिर्मितीच मोल व्हायलाच हव .यासाठी पुस्तक विकत घ्या आणि जे घेऊ शकणार नाहीत त्यांना हे संचित भेट म्हणून द्या.
अतिशय छान पुस्तक आहे
ReplyDelete