वृत्त , यमक (काफिया) , अन्त्ययमक (रदीफ ) हे गझलेचे मुख्य घटक आहे . थोडक्यात गझलेचे व्याकरण म्हणता येईल . मराठीत सुरेश भट यांनी गझल प्रकार रूढ आणि लोकप्रिय केला . त्यांनी "गझलेची बाराखडी " मधून गझल-तंत्र समजावले आहे . केवळ तंत्र समजून कविता साकारता येत नाही त्यासाठी आत्मा ओतावाच लागतो .
२. वृत्त , यमक (काफिया) , अन्त्ययमक (रदीफ ) या घटकातून गझलेचे स्वरूप स्पष्ट होते . त्याचा आशय उलगडतो . एकत्रितपणे त्यास आकृतीबंध (जमीन) म्हणतात . प्रथम यमक (काफिया) , अन्त्ययमक (रदीफ ) समजून घेऊ .
जगणे माझे उसवण्याचे विसरून गेलोय मी
३. यातील दबून, करून, समजून,हरवून, विसरून हे यमक आहे . यमक पहिल्या , दुसऱ्या त्यानंतर प्रत्येकी दुसऱ्या ओळीत येते . तर गेलोय मी हे अन्त्ययमक आहे . सर्वसाधारण वरील क्रमाने गझल लिहिली जाते . वेगवेगळ्या गझलांचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल की ,अन्त्ययमक असलेच पाहिजे असे नाही . दबून, करून, समजून,हरवून, विसरून यात ऊन ही अन्त्यअक्षरे पुन्हापुन्हा येतात." ऊ" हा अटळपणे येणारा स्वर म्हणजे "अलामत " ,या स्वरामुळे गझलेत प्रवाहीपणा येतो .
४ . सुरेश भट यांना उर्दूतील शब्दांच्या वजनदारपणामुळे घुसमटपणा जाणवत होता. त्यांनी गझलेमध्ये वृत्ताला महत्व दिले आहे. मराठीत मूळ दोन वृत्ते आहेत. अक्षरगणवृत्त व मात्रावृत्त
५. सुरेश भट यांनी गझल शक्यतो गणवृत्तात असावी असे सूचित केले आहे. मूळ उर्दू शेरोशायरीत शब्दांच्या वजनाला ,लहेजाला फार महत्व आहे. गझल वृत्तामध्ये कशी बांधावी असा प्रश्न उद्भवू शकतो. वृत्ताला महत्व द्यावे की भावनेच्या प्रवाहाला असा गोंधळ सुरवातीला होऊ शकतो.गझलेच्या सर्वसाधारण आकृतीबंधात भावना प्रतिबिंबीत झाली तर ,वृत्तांच्या तांत्रिक रचनेत गझल बसवण्याची कसरत करावी लागणार नाही.
आपल्यांच्या अपेक्षांत दबून गेलोय मी
स्व:त्व नकळत अर्पण करून गेलोय मी
माझे असावे असे माझे काही नाही
का उगा याला माझे जग समजून गेलोय मी
माझे असे जगणे केव्हाचे ताटकळले
जगण्याचे संदर्भ माझे हरवून गेलोय मी
स्वार्थ प्रत्येकाचा दिसे केविलवाणा
निरपेक्ष प्रेम तयांचे निसटून गेलोय मी
तलम धागे जगण्याचे एकमेकात विणलेले
४ . सुरेश भट यांना उर्दूतील शब्दांच्या वजनदारपणामुळे घुसमटपणा जाणवत होता. त्यांनी गझलेमध्ये वृत्ताला महत्व दिले आहे. मराठीत मूळ दोन वृत्ते आहेत. अक्षरगणवृत्त व मात्रावृत्त
अक्षरगणवृत्त : अक्षरगणवृत्त प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी असते व ऱ्हस्वदीर्घ क्रम सारखा असतो.
मात्रावृत्त : मात्रावृत्तामध्ये प्रत्येक चरणातील अक्षरसंख्या महत्वाची नसून मात्रासंख्या ठराविक असते.
वरीलसंकल्पना समजून घेण्यासाठी चरण, गण, मात्रा, लघु-गुरु क्रम, यती समजून घेणे आवश्यक आहे.
1. चरण : पद्याच्या प्रत्येक ओळीस चरण म्हणतात.
2. गण : अक्षरांच्या गटाला गण म्हणतात. अक्षरणगणवृत्तामध्ये 3,3 अक्षरांचा एक गट केला जातो.
2. गण : अक्षरांच्या गटाला गण म्हणतात. अक्षरणगणवृत्तामध्ये 3,3 अक्षरांचा एक गट केला जातो.
3. ऱ्हस्व दीर्ध : ऱ्हस्व अक्षर u ने व दीर्घ अक्षर -ने दर्शवले जाते.
4.यती : कविता म्हणताना आपण जिथे काहीक्षण थांबतो(pause ) त्यास यती म्हणतात.
5.मात्रा : मात्रा मोजताना लघु अक्षर एक मात्रा तर गुरु अक्षर दोन मात्रा अशी मोजतात.
५. सुरेश भट यांनी गझल शक्यतो गणवृत्तात असावी असे सूचित केले आहे. मूळ उर्दू शेरोशायरीत शब्दांच्या वजनाला ,लहेजाला फार महत्व आहे. गझल वृत्तामध्ये कशी बांधावी असा प्रश्न उद्भवू शकतो. वृत्ताला महत्व द्यावे की भावनेच्या प्रवाहाला असा गोंधळ सुरवातीला होऊ शकतो.गझलेच्या सर्वसाधारण आकृतीबंधात भावना प्रतिबिंबीत झाली तर ,वृत्तांच्या तांत्रिक रचनेत गझल बसवण्याची कसरत करावी लागणार नाही.
उदा . खालील गझल . यातील जगले , आगळे , झाले , फेसाळले हे यमक आहे . तर होते हे अन्त्ययमक आहे . जगले , आगळे , झाले , फेसाळले यातील शेवटची दोन अक्षरे पहा . अले , अळे , आले . अले असे आहेत . अलामत योग्य रित्या नसली तरी जवळपास आहे .
काफिया , अलामत जगले होते
काफिया , रदीफ चे नाते आगळे होते
लिहिली गझल रक्ताने ओथंबून
नाव मात्र गायकीचे झाले होते .
भाव सारे ओतले जमीनीत
हसे तरीही जगण्याचे झाले होते .
हे गझल का घात माझा करून
अजनबी जाम फेसाळले होते .
No comments:
Post a Comment