"समुद्राचं
गाव"
या
कवितासंग्रहाचं नाव माझी
ताई सोनालीने सुचवलं .समुद्र
,
गाव
या संदर्भांशी कुठलीही व्यक्ती
लगेच रिलेट होऊ शकते .
तसंच
झालं माझं .
कुठलाही
समुद्र त्याच्या लाटांनी
,त्याच्या
गाजांनी तुम्हाला गुंतवून
टाकतो .
गणपतीपुळेचा
समुद्र मंदिर,
माणसं
आजूबाजूला असूनही काहीसा
अबोल ,
अलिप्त
,स्वमग्न
,शांत
आहे . समुद्र
म्हटला की ,
त्या
सोबत गाज ,
लाट,
पाखरं
,
शंख
,
शिंपले,
वाळू
,
डोंगर
आपसूकच येतात.त्यांची
एक अनामिक नाळचं जुळलेली असते
म्हणा ना .
हे आंतरीक नातं हळुवार उलगडतं जातं कवितासंग्रहाच्या वेगवेगळ्या भागातून . समुद्र , पाऊस , जंगल,नदी, पक्षी , प्रेम, विरह या भागातून समुद्र परतून परतून तुमच्या भेटीला येतो ." वारा दमलेला नाही ...माड डोलून डोलून वाकले नाहीत ...लाटांचा सूर ढळलेला नाही ...." कवयित्रीचं हे गद्य मनोगतही नादमय होतं . तिचं समुद्राशी जुळलेलं घट्ट नातं तिच्या मनोगतातून तसंच , "हातापायांना माखलेला मातीचा लाल रंग उडूच नये कधी .... समुद्राची गाज ऐकायची सवय मोडूच नये कधी ..." यासारख्या अनेक ओळीतून पदोपदी प्रत्ययास येतं .
" आरतीच्या कविता एकामागून एक भरभर वाचता येणं शक्य नाही . शांतपणे एकावेळी एक वाचली पाहिजे.तिच्या निसर्गामध्ये भेटणाऱ्या विलक्षण स्तब्धतेमध्ये आपणही काही काळ दिला पाहिजे " मृदुभाषी , व्यासंगी अविनाश धर्माधिकारी सर नेमकं विश्लेषण करतात. याचा प्रत्यय कविता वाचताना येऊ लागतो . ही विलक्षण स्तब्धता मनाला थेट भिडत मनावर हळूवार स्वार होऊ लागते .
उधाणाच्या लाटांना चांदण्यांचा वर्ख चढलाय .... अगदी चपखल उपमा . ज्यांनी गणपतीपुळेचा समुद्र पाहिलाय त्यांच्या डोळ्यासमोर चंदेरी लाटा लगेच फेर धरू लागतील. पहिल्याचं कवितेत मी गुंतलो होतो . शहरात असून समुद्रावर विहरू लागलो होतो . याबद्दल "सौमित्र " म्हणजे किशोर कदम अधिक समर्पकपणे व्यक्त होतात . ते म्हणतात .
"गाज " हा शब्द कवयित्रीला खूप भावतो असं वाटतं .कवितेतून अनेकदा तो भेटीला येतो . ( "गाज " या पुरस्कार विजेत्या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्माती दिग्दर्शक कवयित्री आहे. ) गाज म्हणजे समुद्राच्या अव्यक्त भावनाचं. आपण शब्दांनी व्यक्त होतो.... समुद्र गाजाने. कवयित्री समुद्राच्या गाजात गुंतली असतानाच तिला शुभ्र बगळा, फेसाळ लाटा , लाल माती, गाव खुणावत आहे. त्यांच्या पाऊलखुणा शब्दातून व्यक्त होतात. तिची निसर्गाबद्दलची आसक्ती, "किती वेळा इथे येतो समुद्रापक्षी लाटांवर.. किती धूसर रंग मिसळतात....ओहोटीच्या गडद पाण्यावर ... " अशा ओळीतून अधिक गडद होऊ लागते .
पावसाच्या सरीबरोबर मनकोन्यातून आठवणी झिरपू लागतात. काही आठवू लागतं . काही दवबिंदू सारखं निसटू लागतं . धुक्यात हरवलेलं हे स्वप्नातलं जग कोसोमैल दूर आहे , याची कवयित्रिला पूर्ण जाणीव आहे. ती समुद्राच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. परंतु हा निव्वळ रोमॅंटिजम नाही. तिन सामाजिक भानही तितक्याच सहजपणे जपलयं हे, “क्लायमेट चेंजचा विषय सध्यातरी टाळावा त्याच्यासमोर...त्यापेक्षा सांगून बघावी त्याला मराठवाडयाच्या शेतकऱ्याची व्यथा... " अशा ओळीतून, “आरे” तली झाडं अशा कवितेतून प्रत्ययास येतं .

"
एखादी
व्यक्ती चुकून शहरातल्या
गदारोळात जगावी ,
एखादी
व्यक्ती शहरातल्या कॉर्पोरेट जगात मारूनमुटकून काम करत
असताना मनाने सतत रानावनात
असावी...
गर्दीत
राहूनही झुडपातल्या फुलपाखरासारखी
रंगून जावी ...तशी
आरतीची कविता वाटते ."
"गाज " हा शब्द कवयित्रीला खूप भावतो असं वाटतं .कवितेतून अनेकदा तो भेटीला येतो . ( "गाज " या पुरस्कार विजेत्या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्माती दिग्दर्शक कवयित्री आहे. ) गाज म्हणजे समुद्राच्या अव्यक्त भावनाचं. आपण शब्दांनी व्यक्त होतो.... समुद्र गाजाने. कवयित्री समुद्राच्या गाजात गुंतली असतानाच तिला शुभ्र बगळा, फेसाळ लाटा , लाल माती, गाव खुणावत आहे. त्यांच्या पाऊलखुणा शब्दातून व्यक्त होतात. तिची निसर्गाबद्दलची आसक्ती, "किती वेळा इथे येतो समुद्रापक्षी लाटांवर.. किती धूसर रंग मिसळतात....ओहोटीच्या गडद पाण्यावर ... " अशा ओळीतून अधिक गडद होऊ लागते .
पावसाच्या सरीबरोबर मनकोन्यातून आठवणी झिरपू लागतात. काही आठवू लागतं . काही दवबिंदू सारखं निसटू लागतं . धुक्यात हरवलेलं हे स्वप्नातलं जग कोसोमैल दूर आहे , याची कवयित्रिला पूर्ण जाणीव आहे. ती समुद्राच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. परंतु हा निव्वळ रोमॅंटिजम नाही. तिन सामाजिक भानही तितक्याच सहजपणे जपलयं हे, “क्लायमेट चेंजचा विषय सध्यातरी टाळावा त्याच्यासमोर...त्यापेक्षा सांगून बघावी त्याला मराठवाडयाच्या शेतकऱ्याची व्यथा... " अशा ओळीतून, “आरे” तली झाडं अशा कवितेतून प्रत्ययास येतं .
“वळून
कुणी पाहिलं नाही म्हणून ...माळरानावरच्या
चाफ्याचं अडलं नाही...शेवटी
पानांनाही साथ सोडली.. पण पठ्ठयांन
बहरण सोडलं नाही” ही सोशल
मिडीया ग्रुपवर व्हायरल झालेली
प्रचंड सकारात्मक कविता. त्याचबरोबर कवयित्री कधी कधी स्वमग्न वाटते. ती म्हणते “मला
पटतं झाडांच...फुलायचं
वेड असेल...त्याच्यासोबत
फुलण्यात जास्त मजा आहे...तिची
स्वमग्नता कवितेतून जाणवत
असली तरी तिच्या कविता खोलवर समजून
घेण्यासाठी कवितासंग्रहातून त्या अनुभवल्या पाहिजेत .
ज्या
शहारात समुद्र नाही तिथे तिला
खंत जाणवते “मानो तो इस शहर
मे सबकुछ है...मगर
क्या करे, समंदर
नही है...अशा
ओळीतून तिची खंत व्यक्त होते कवयित्रीचं समुद्राबद्दलचं प्रेम मला राधा -कृष्णाच्या प्रेमासारखं वाटतं ... सगळ
असूनही कृष्ण जवळ नसल्याची
खंत राधाला जशी व्यथित करते, तशीच कवयित्रीला त्याची उणीव
अस्वस्थ करते. ही
अस्वस्थता, प्रेम, आसक्ती
तुम्हाला स्तब्ध करते. माझ्यापुरत
म्हणाल तर मी कविता वाचता
वाचता चार भिंतीतून, केव्हाच
समुद्राच्या किनाऱ्यावर
त्याच्या गाजात एकरूप झालो
होतो. हे अनुभव वाचून सांगता येत नाहीत. शहरातून समुद्रावर पाऊल ठेवाल तेव्हाच तुमच शहरी कवच आपोआप निखळलेलं असेल. प्रत्यक्ष जाणं शक्य नसेल तर सौमित्र म्हणतात तश्या अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी कवितासंग्रह नक्की वाचा...
No comments:
Post a Comment