Wednesday, 21 December 2016

जगणं म्हणजे नेमकं काय ?

जगणं म्हणजे नेमकं काय ?
एक क्षण जगलेला
एक क्षण विरलेला

जगणं म्हणजे नेमकं काय ?
क्षण जाणिवांनी मोहरलेला
कधी भकास होरपळलेला

जगणं म्हणजे नेमकं काय ?
एक क्षण सरलेला
स्वप्न होऊन उरलेला

जगणं म्हणजे नेमकं काय ?
प्रकाश- सावल्यांचा खेळ
मृगजळ होऊन भारलेला

No comments:

Post a Comment