Friday, 21 July 2017

मला काहीच प्रॉब्लेम नाही (MKPN MOMENTS)

तू चिवचिवाट करत येतेस
अन भुर्रकन उडून जातेस
तू येतेस,   थोडे लाड करतेस
थोडी रुसतेस  , थोडी उरतेस

तू येतेस थोडी साखर पेरतेस
विरघळण्याआधीच लुप्त होतेस
तू येतेस,  सप्तरंगी नजाकतीसह
अस्वस्थ सोडून निघून जातेस

तू येतेस,  थोडी  मूक बसतेस
चोरटा  कटाक्ष हळूच देतेस
न राहवून नक्कीच डिवचतेस
सावरण्या आधीच निघून जातेस

तू येतेस,   कविता  माझ्या
कोरड्या नजरेने  पाहतेस
चित्रांना   हृदयातल्या माझ्या
रंगहीन मुद्रेने फटकारतेस

पण ,

मला काहीच प्रॉब्लेम नाही
कारण तुझं हसणं , तुझं रुसणं
आपलं आपल्यात  गुंतणं
हा प्रत्येक  क्षण माझा असतो

तू जशी आहेस तशीच ये
तुझा सुगंधी सहवास दे
कारण तो सहवास माझा
तो गंध फक्त माझा

तू केव्हा येशील माहित नाही
पण विखुरलेले क्षण जपण्यास
मृगजळात या हरवून जाण्यास
मला काहीच प्रॉब्लेम नाही


  

No comments:

Post a Comment