तुमच्या परिघात डोकावणं ,
तुम्हाला गृहीत धरणं,
हे मला कळत का नाही ?
केवळ हतबल होतो म्हणून ......
हे मला कळत का नाही ?
केवळ हतबल होतो म्हणून ......
भडव्यांनो तुम्हीही स्वार्थी,
हे मला अवगत का नाही ?
तसा मीही स्वार्थीच
प्रत्येकजण आपला स्वार्थच तर जपतोय ....
तुम्हाला शिव्या देण्याइतकी अन न बोलता
पाझरण्याइतकी नाती घट्ट आहेत काय ?
हा प्रश्न पडतो मनाला......
वाटत सर्वच किती फॉर्मल झालय ..... आयुष्यही .
No comments:
Post a Comment