मग्न झऱ्याखाली भिजताना
सर्वस्व भिजावं ...
इतकही .....
समर्पण नसावं ...
धुंद क्षितीजाच्या रेषेत
विरघळून जावं
इतकही .....
समर्पण नसावं ...
चांदण्या रात्रीत विहरताना
एक तारा व्हावं
इतकही .....
समर्पण नसावं ...
स्वछंदी वाऱ्यासोबत वाहताना
दिशाहिन व्हावं
इतकही .....
समर्पण नसावं ...
चेहरा नयनात (तिच्या )पाहताना
स्वतःलाही विसरावं
इतकही .....
समर्पण नसावं ...
दिशा खुणावतील
धुक्यात केव्हातरी ....
हाक न द्यावी ....
इतकंही आत्ममग्न नसावं ...
कविता तिच्या गुंफताना
गझलेत दुःख उरावं ...
इतकंही ....
स्वत्वंहिन वेड नसावं....
No comments:
Post a Comment