गजरा
अमृता प्रीतम म्हणतात ....
पुर्ण स्त्री कधी कुठल्याही पुरुषाला लाभलीच नाही...
तिच्या सर्व संवेदनासह आणि
आतल्या संपूर्ण आवेगासह ...
ती अस काही म्हणायची ...
त्याला कधी काही कळलच नाही.
त्याला वाटल ...
गाडी आहे...मोठ घर आहे ..
आणि घराला घरपण देणारी..
दोन गोड गोड पाखर आहेत..
सगळ तर बर चाललेल आहे...
ती म्हणायची ...
फुलांचा गजरा ...
तू मला कधी माळला नाहिस...
टेरेसवरचा चंद्र ..
हाती कधी धरला नाहीस...
डोळयात खोल बघून ...
माझ्या कधी बोलला नाहीस..
हातात हात...
प्रेमाने कधी घेतला नाहीस...
त्याला वाटल हे कसल तिच खूळ..
गजरा , चंद्र , डोळे त्यात काय आहे ?
कपल टूरला तर आताच जाऊन आलो ..
आणि सुखांची तर नुसती बरसात केली...
त्याला कळेना तरीही का तिची ही चुळ्बूळ
त्याला कधी काही कळलच नाही ....
ती म्हणायची ...
गजरा प्रतीक आहे रे फक्त ...
कागदावर दोन गोड ओळी लिही फक्त
नाहीतर गजरा लिही फक्त ..
तरीही मी माळीन केसात..
त्यात तुझ मन ओत फक्त ..
मनाने मनाला माळ फक्त ...
तो गोंधळला ...
ती काय म्हणतेय त्याला कळलच नाही...
आज तो गजरा शोधत होता रस्ताभर
फुलवाली म्हणाली साहेब उशीर झाला
या लॉकडाऊन मधे कुठे मिळणार गजरा..
आणि मिळालाच तर तुम्ही spray मारुन देणार...
अहो फक्त प्रेमाने द्या..मनाने माळा घेईल ती ..
मनाने कसा माळायचा गजरा....
त्याला कधी हे कळलच नाही ....
अजय भोसले.
No comments:
Post a Comment