विचारांनी
केला कल्लोळ असा
कुठल्या
वाटेने जाऊ मी आता
पोपटपंची
मनावर अशी बिंबली
तिनेच
माझा आता घात केला
विचारांची
सिध्दता न शिवली मना
डोळे
झाकून मार्ग हा काटला
या
वळणावर झालो हतबल
परतीचा
मार्ग माझा खुंटला
नाही
वाचन नाही चिंतन
जगरहाटीत
राहिलो गुंतून
नाही
मनाला एकटा सोडला
डाव
जिंकला पण मोडला
बुध्दीची
न झाली स्पष्टता
दुनियेचा
नियम मला भोवला
या
गर्दीतला एक मी झालो
माझेच
वेगळेपण कळले न मलाआयुष्य
सकाळी आवरायचं अन
पळतपळत कामाला निघायच
धक्के खात जीवनाचे
पिल्लांच्या ओढीने परतायचं
पिल्लांसाठी वणवण भटकायचं
अन पिल्लांनी facebook मध्ये रमायचं
आयुष्यभर मुलांना शिकवायचं
अन प्रवेशासाठीही रक्त आटवायच
छंदाना मनातल्या मनातच कोंडायच
त्यांच्या आनंदात सुख पाहायच
वेगळ्या वाटांना आपणच रोखायच
चाकोरीतच दिवसांना ढकलायचं
भविष्याच्या मोहजालात फसायचं
पिल्लांतच आपल विश्व पाहायच
तरीही xxx नी अखेरीस लाथाडायच
यालाच रीत म्हणत आयुष्य काढायचं
नाती
नभ आले भरून
कागदाची नाव गेली विरून
apple आला हाती
मुले गेली रमून
टायरच्या चाकात गेलो हरवून
निरागस मजा गेली विरून
xbox च्या शर्यतीत
मुले गेली गढून
नव्हता पैसा नव्हती चिंता
आनंद शोधला चिखालातही
सर्व अाहे नाहीत नाती
माणसातच काय मजा होती
रस्त्या वरच्या पकड-पकडीने
असा धागा विणला
whatsapp च्या message पेक्षा
तो जास्त घट्ट जमला
No comments:
Post a Comment