एकांत हा भयानक असतो . जर तुमच्या आयुष्यातील एकमेव आधार तुमच्यापासून दूर होणार असेल तर...... काय संवेदनशील, नाजूक अवस्था निर्माण होईल . आपल्या मुलीच्या आयुष्यात तिचा जोडीदार येणे , त्यांनी आपले भविष्य ठरवणे … इतर कोणत्याही समस्या नसतील तर आईसाठी ती एक सुखःद घटना आहे . परंतु या कथेतील आई एकांतपण , असुरक्षितता, काळजी या संमिश्र भावनांनी वेढली आहे .
मानवी स्वभावाचे कंगोरे काही पटकन दिसून येत नाहीत, अशा परीस्थितीत अनपेक्षित रीतीने ते समोर येऊ लागतात . मुलगी आणि तिचा जोडीदार यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण करून आई आपल्या परीने उपाय शोधत आहे . मुलीला हे अवगत झाल्यावर साहजिकच एक प्रतिरोधाच नाट्य सुरु होत. आत्मविश्वास नसलेली मुलगी आणि अनुभवाच्या शिदोरीतून परिपक्व झालेली आई यांच्यातील भावनीक जुगलबंदीतून मानवी स्वभावाचे कप्पे उलगडू लागतात .
प्रत्येकाच एक स्वतंत्र आयुष्य असत , आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याचा स्वतःला अधिकार असतो ही विचारसरणी अजून आपल्या समाजात रुजलेली नसल्यामुळे नाटकाची कथा जवळची वाटते .
नीना कुलकर्णी -आई , मुक्ता बर्वे -मुलगी यांनी त्यांच्या नात्यातील तणाव , भावनिक चढ-उतार सूक्ष्मपणे साकार केले आहेत . केवळ उत्तम अभिनय , सादरीकरण यासाठी नाटक पाहण्यास हरकत नाही .

No comments:
Post a Comment