Wednesday, 29 July 2015

LOVEBIRDS

             नायकाचा अपघात …. त्याची स्मृती जाणे .  "LOVEBIRDS" च्या बिलावरून स्वतःचा आणि भूतकाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे …… या शोधात काही धक्कादायक गोष्टी समोर येणे….  अशी काहीशी फिल्मी स्टाईल ची  रहस्यमय कथा आहे . 
             रंगमंचावरील सादरीकरणाच्या , तसेच इतर मर्यादेमुळे स्क्रीन चा प्रभावी वापर करण्यात आला आहे . मुक्ता बर्वे यांनी नेहमीच्या सहजतेने काम केले आहे . विद्याधर जोशी यांनी रंगविलेला  गुप्तहेर नेहमीच्या पठडीतील नसून थोडा वेगळ्या पध्दतीचा आहे . 
           शेवट काय होईल याची उत्कंठा शेवटपर्यंत राहते . रहस्यकथा वाचणे आणि पाहणे , हे दोन वेगवेगळे अनुभव आहेत. रहस्यकथा आवडत असतील तर या नाटकाचा अनुभव घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल . 


No comments:

Post a Comment