Saturday, 1 August 2015

देहभान

         एका महाविद्यालयातील मुलांना "देहभान" या कादंबरी वर आधारित नाटक करायला दिल जात. नाटकातील नाटकातून वर्तमानकाळ आणि भूतकाळाचे प्रसंग उलगडत  जातात . टाईम मशीन सारखे . 

         समाजाच्या भीतीपोटी भावनांना दाबून ठेवणारी मुख्याधापिका  …. आयुष्याचा मुक्तपणे आनंद घेणारा चित्रकार , प्रवाहाविरुध्द जाणारी  बंडखोर समाजसेविका  , समाजशिक्षणाची कळकळ  असलेला मास्तर ,  नाटकातील प्रसंगातून आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत  भविष्याचा वेध घेणारे  विद्यार्थी …. एक सलग कथा न दाखवता वेगवेगळ्या प्रसंगातून समाजातील विविध स्वभावविशेष , भावना ,अज्ञान उलगडून दाखविण्यात आले  आहे.नाटकात   राजन भिसे , ईला भाटे , रेश्मा रामचंद्र अशा प्रमुख कलावंता बरोबर इतर कलाकार आहेत  . 

       नाटक दोन काळात फिरत आहे . दोन काळातील विरोधाभासावरील चर्चा विचार करायला प्रवृत्त करते. तुमचा जगण्याचा दृष्टीकोन व्यापक असेल आणि दृष्टी विशाल असेल तर "देहभान" हे नाटक कालबाह्य वाटेल . आपल्या समाजात सकस शिक्षणाचीच अजून आबाळ आहे तर व्यापक दृष्टीकोन कुठून येणारं .त्यामुळे विचार करायला लावणाऱ्या अशा नाटकांचा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात जाणिवपूर्वक प्रसार होणे आवश्यक वाटते . नाटकाचा विषय प्रायोगिक वाटत असला तरी त्याला योग्यप्रकारे व्यावसायिक स्वरूप देण्यात आल्यामुळे नीरस होत नाही .  या नाटकाने तुमचा समाजा बद्दलचा  दृष्टीकोन अधिक व्यापक व्हायला मदतच होईल . 
         

No comments:

Post a Comment