भारतीय संस्कृतीत live-in -Relationship ही संकल्पना तितकीशी रुचणारी नाही . याच कारण प्रत्येकाच एक स्वतःच जग असत आणि ते फक्त त्यांच असल्यामुळे त्यात ढवळाढवळ करू नये , हे साधे शिष्टाचार आपण पाळत नाही. त्यांच्या वैयक्तीक गरजा असू शकतात , याचा विचार न करता , संस्कृतीच्या पगड्यामुळे समाज फार कोत्या नजरेतून स्वतःचीच मत लादून परिस्थितीचे परीक्षण करत असतो .
उतारवयात एकाकी झालेल्या दोन व्यक्तींना त्यांची space मिळू नये का? ते सहवासाची अपेक्षा ठेवू शकत नाही का? एकमेकाच्या भेटीमुळे दोन व्यक्तींना आनंद मिळत असेल , आश्वस्त वाटत असेल तर समाजाच्या कलुषित दृष्टीकोनामुळे अशा दोन जीवांची घुसमट का व्हावी ?
पत्नीवर प्रेम करणारे ससाणे (संजय मोने )व नवऱ्याच्या प्रेमाला , प्रामाणिकपणाला मुकलेल्या साठे (स्वाती चिटणीस ) …. जोडीदार गमावल्यामुळे एकाकी झालेल्या या दोन व्यक्तिरेखांची ही कथा आहे .त्यांच्या भेटीला "शेवग्याच्या शेंगा" निमीत्त ठरत अन एका निष्पाप नात्याला सुरवात होते . या कथेला अजून दोन उपकथानकांची जोड देऊन तरुणवयीन , मध्यमवयीन , उतारवयीन तीन पिढ्यामधील नाते संबंध उलगडून दाखविण्यात आले आहेत .
नाटक, तीन पिढ्यांच्या आवर्तनातून फिरताना शरीरासक्ती , मानसिक गरज, प्रेम, आपुलकी , स्वार्थ अशा जीवनातील अनिवार्य घटकांची मर्यादा व गरज स्पष्ट करत . हलक्या-फुलक्या व गंभीर प्रसंगाची गुंफण समतोल राखत केल्याने व तीन पिढ्यातील स्वभावविशेषांचे खुमासदार पद्धतीने सादरीकरण झाल्याने नाटकातील एक निष्पाप गोडवा शेवटपर्यंत रंगत आणतो .
दिग्दर्शक-गजेंद्र अहिरे
No comments:
Post a Comment