एखाद
व्यक्तीमत्व यशस्वी झाल की,
आपण
त्याच्या बालपणाचा वेध घेऊ
लागतो. बालपणात त्या व्यक्तीची
जडणघडण कशी झाली,
त्याला
पोषक वातावरण होते का ?
शिक्षकांचा
सहभाग याबद्दल आपणास प्रश्न पडतात. डॉ. फ्लेमिंग , डॉ . कार्व्हर अशा व्यक्तीची चरित्र वाचली
की चकित व्हायला होत.
आपल्या
मुलांना आज सर्व सुविधा उपलब्ध
करुन देऊनही ते या व्यक्तीमत्वांच्या
जवळ पास किंवा लक्षवेधक यश का नाही मिळवू शकत. याच
उत्तर आहे, आपण देत नाही तो
दृष्टीकोन अन् हा दृष्टीकोन
देण्यासाठी व्यक्ती शिक्षीतच
हवी अस नाही,
त्यासाठी लागते प्रामाणिक आंतरीक
तळमळ.......
शिक्षणाचे
नेमक महत्व...
विशाल
दृष्टीकोन.
जालना, भोकरदन तालुक्यातील देहेड गावातील ज्या अशिक्षित माणसाकडे हा दृष्टीकोन होता ते गावाने उपाधी दिलेले “बॅरिस्टर” झाले. शिक्षणामुळे माणसात बदल होऊ शकतो, या विचाराने झपाटलेले “बॅरिस्टर” म्हणजे भविष्यापेक्षा कर्तव्यावर विश्वास ठेवणारे डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर यांचे वडील.
नि:स्वार्थ वृत्तीचे करतडे आजोबा , शिक्षणाचा अट्टाहास धरणाऱ्या आई , उच्च शिक्षणासाठी सोबत देणारे भाऊ , प्रेमळ मदनशेठ या त्यांच्या आयुष्यातील साध्या पण असामान्य व्यक्तिरेखांनी डॉक्टरांच्या जीवनाला दिशा दिली .सामाजिक कार्य करताना अनेकदा कुटुंबाच्या, इतरांच्या सुखाचा विचार बाजुला ठेवावा लागतो. त्याची बोच मनात राहतेच. ही खंत त्यांच्या आत्मकथनात जागोजागी जाणवत राहते . अन डॉक्टरांच्या मनाचा संवेदनशील कोपरा हळुवार उलगडत जातो .
डॉ. हिम्मतराव बावस्कर म्हणजे गावरान बोलीभाषेत बोलणारा महाडच्या मातीत वसलेला, त्या परिसराला सर्पदंश/विंचूदंशातून मुक्त करण्याचा वसा घेतलेला साधा कर्तव्यकठोर , गर्विष्ठपणाचा लवलेश नसलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त असलेला कर्मयोगी डॉक्टर. डॉक्टरांची कर्तव्यावर निष्ठा इतकी की, वडिलांच्या निधनाच्या वेळीही अंत्यदर्शनापेक्षा रुग्णसेवेसच प्राधान्य दिले. शिक्षणावर नितांत श्रध्दा. शिक्षणाने मनुष्य सुशिक्षीत होतोच असे नाही , संस्कृती घराघरात जन्मावी लागते या विचारातून त्यांच्या जीवनातील ध्येयवादी प्रवास स्पष्ट होऊ लागतो .
शहरात राहून सहजपणे लाखो रुपये कमविण्याची क्षमता असताना एका खेडेगावात फकिराच्या वृत्तीने समाजोपयोगी काम करणे सोपी गोष्ट नाही . भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या फ्लॅट, गाडी, सुखवस्तु जीवन यातच सुख शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम्हा शहरवासीयांना अशा संन्यस्त माणसाच्या वृत्तीचे गमक त्यांचे "बॅरिस्टरचे कार्ट " हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल.
कोकणात विषारी विंचूदंशाचे प्रमाण मोठे आहे . विंचूदंशासाठी त्या काळात पुरेसे संशोधन नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावत . ग्रामीण भागात पुरेशा सुविधा नसल्यामुळे संशोधनाला मर्यादा येतात . येथील मंडळी परदेशी संशोधनावर अवलंबून राहत असल्यामुळे स्वतः मेहनत घेऊन संशोधन करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही . संशोधनाची सुरवात प्राप्त परिस्थितीला शरण न जाण्याच्या वृत्तीतून आणि त्या परिस्थितीला बळी पडलेल्या लोकांच्या कणवेतून निर्माण होते. डॉक्टरांनी याच तळमळीतून तेथील अनेक रुग्णांचा विषम परिस्थितीत अभ्यास करून विंचूदंशावर उपाय शोधून काढला .
आपल्या
शिक्षण पध्दतीत एखादया माणसाच्या
कर्तृत्वापेक्षा त्याच्या
इंग्रजीला किती महत्व दिले
जाते पहा.
अजूनही
इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीतून
आपण मुक्त झालेलो नाही,
याचा
खेद होतो.
डॉक्टरांचे खालील बोलके उदाहरण आपल्या समाजातील मानसिक गुलामगिरी , नकारात्मक वृत्तीचे दर्शन घडविते .
जालना, भोकरदन तालुक्यातील देहेड गावातील ज्या अशिक्षित माणसाकडे हा दृष्टीकोन होता ते गावाने उपाधी दिलेले “बॅरिस्टर” झाले. शिक्षणामुळे माणसात बदल होऊ शकतो, या विचाराने झपाटलेले “बॅरिस्टर” म्हणजे भविष्यापेक्षा कर्तव्यावर विश्वास ठेवणारे डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर यांचे वडील.
नि:स्वार्थ वृत्तीचे करतडे आजोबा , शिक्षणाचा अट्टाहास धरणाऱ्या आई , उच्च शिक्षणासाठी सोबत देणारे भाऊ , प्रेमळ मदनशेठ या त्यांच्या आयुष्यातील साध्या पण असामान्य व्यक्तिरेखांनी डॉक्टरांच्या जीवनाला दिशा दिली .सामाजिक कार्य करताना अनेकदा कुटुंबाच्या, इतरांच्या सुखाचा विचार बाजुला ठेवावा लागतो. त्याची बोच मनात राहतेच. ही खंत त्यांच्या आत्मकथनात जागोजागी जाणवत राहते . अन डॉक्टरांच्या मनाचा संवेदनशील कोपरा हळुवार उलगडत जातो .
डॉ. हिम्मतराव बावस्कर म्हणजे गावरान बोलीभाषेत बोलणारा महाडच्या मातीत वसलेला, त्या परिसराला सर्पदंश/विंचूदंशातून मुक्त करण्याचा वसा घेतलेला साधा कर्तव्यकठोर , गर्विष्ठपणाचा लवलेश नसलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त असलेला कर्मयोगी डॉक्टर. डॉक्टरांची कर्तव्यावर निष्ठा इतकी की, वडिलांच्या निधनाच्या वेळीही अंत्यदर्शनापेक्षा रुग्णसेवेसच प्राधान्य दिले. शिक्षणावर नितांत श्रध्दा. शिक्षणाने मनुष्य सुशिक्षीत होतोच असे नाही , संस्कृती घराघरात जन्मावी लागते या विचारातून त्यांच्या जीवनातील ध्येयवादी प्रवास स्पष्ट होऊ लागतो .
शहरात राहून सहजपणे लाखो रुपये कमविण्याची क्षमता असताना एका खेडेगावात फकिराच्या वृत्तीने समाजोपयोगी काम करणे सोपी गोष्ट नाही . भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या फ्लॅट, गाडी, सुखवस्तु जीवन यातच सुख शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम्हा शहरवासीयांना अशा संन्यस्त माणसाच्या वृत्तीचे गमक त्यांचे "बॅरिस्टरचे कार्ट " हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल.
कोकणात विषारी विंचूदंशाचे प्रमाण मोठे आहे . विंचूदंशासाठी त्या काळात पुरेसे संशोधन नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावत . ग्रामीण भागात पुरेशा सुविधा नसल्यामुळे संशोधनाला मर्यादा येतात . येथील मंडळी परदेशी संशोधनावर अवलंबून राहत असल्यामुळे स्वतः मेहनत घेऊन संशोधन करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही . संशोधनाची सुरवात प्राप्त परिस्थितीला शरण न जाण्याच्या वृत्तीतून आणि त्या परिस्थितीला बळी पडलेल्या लोकांच्या कणवेतून निर्माण होते. डॉक्टरांनी याच तळमळीतून तेथील अनेक रुग्णांचा विषम परिस्थितीत अभ्यास करून विंचूदंशावर उपाय शोधून काढला .
“लॅन्स्टेट” जर्नल म्हणजे वैदयकिय क्षेत्रातील “गीता”. यात लेख छापून येणे सोप नाही. अनेक प्रथितयश डॉक्टर या वैद्यकीय जर्नल मध्ये आपले लेख यावेत म्हणून प्रयत्न करत असतात्त . विंचूदंशवरील एक प्रबंध डॉक्टरांनी प्रथम भारतातील एका वैदयकीय नियतकालिकाला पाठविला होता. तांत्रिक कारणाबरोबर इंग्रजी अशुध्द म्हणून लेख नाकारण्यात आला त्यानंतर त्यांनी तो लेख “लॅन्स्टेट” कडे पाठविला. आता दोन मनोवृत्तीतील फरक पहा.
इंग्रजी सुधारित करण्यासाठी “लॅन्स्टेट”कडून नम्रपणे परवानगी मागण्यात आली.एकाने त्या प्रबंधातील आशयाकडे, महत्वाकडे लक्ष न देता तांत्रिक बाजूवर प्रबंध नाकारला . तर दुसऱ्याने त्या प्रबंधाचे महत्व जाणून स्वीकारला . एखादयाचे कर्तृत्व जर फक्त इंग्रजी भाषेवर ठरत असेल तर माणसाच्या अंगभूत कौशल्याचे ,कार्याला वाहून घेणे याचे काय? भाषा या निकषावर एखादया कार्याचे मूल्यमापन होऊ शकते काय ?. जर प्रचलित भाषेतून संशोधनातील मर्म, उद्देश स्पष्ट होत असेल तर इतर गोष्टींना किती महत्व द्यायचे हे कोण ठरवणार ?
त्यांच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.कोणतेही अर्थसहाय्य न घेता स्वबळावर संशोधन करणे हे सोपे काम नाही. या कार्यात कुटुंबाच्या सुखाला तिलाजली दयावी लागते. वैदयकीय क्षेत्रातील अनिष्ट प्रथा, प्रलोभने याला स्वकीयांचा रोष पत्करून दूर ठेवावे लागते . डॉक्टरांनी, रुग्णसेवा हे कर्तव्य मानून रुग्णाचे हित हेच आपले हित मानले .
वैदयकीय संशोधनात समव्यावसायिक व्यक्ती असल्यास त्याचा संशोधन कार्याला फार उपयोग होतो . हे विचारात घेऊन डॉक्टराचे लग्न अंबेजोगाई येथील समव्यावसायिक मुलीशी ठरले . समरस वृत्तीने त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या अर्धागिनीचे कार्यही दुर्लक्षित करुन चालणार नाही.

अंधश्रध्देमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे. सर्पदंश/विंचूदंश यावर आजही वैदयकीय उपचाराऐवजी भोंदू बाबांचा आसरा घेतला जातो . सर्पदंशवरील संशोधनाने व अविरत कार्याने याबद्दलची अंधश्रध्दा दूर करण्याचे डॉक्टराचे विचार, कार्य अत्यंत प्रगल्भ आहेत.
या कार्यात त्यांना अनेक विघ्ने आली सरकारी अनास्था, प्रस्थापितांची व्यावसायिक असुरक्षितता , सामाजिक अंधश्रध्दा अशा विषम परिस्थितीतून मार्ग काढताना संशोधनाचा वसा न सोडता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे . हे कार्य करत असताना ते कायम विदयार्थीच राहिले. शिक्षण, संशोधन याचे जणू त्यांना व्यसनच आहे . डॉक्टरांचा सरळ स्वभाव , कुणाचीही भीडभाड न बाळगता व्यक्त होण्याची वृत्ती भावून जाते . आपल्याकडे त्यांचे कार्य दुर्लक्षित झालं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची योग्य दखल घेतली गेली आहे . आभाळाकडे पाहण्याच्या वृत्तीमुळे छोट कार्य दुर्लक्षित होत . कोणतेही कार्य छोटे नसते ते एका मोठ्या कार्याची सुरवात असते . त्याग भावनेने काम करणाऱ्या या कार्यनिष्ठ व्यक्तिमत्वाची सगळ्यांना ओळख व्हावी हीच सदिच्छा .
No comments:
Post a Comment