केदार शिंदे यांची विक्रम गोखले यांनी घेतलेली मुलाखत अलीकडेच पाहिली . त्यात "सही रे सही" नाटकाबद्दल सांगताना म्हणाले कि, ते उत्तम लेखक नाहीत परंतु visualizer आहेत . "सही रे सही" हे नाटक पाहताना जी दृष्ये रंगमंचावर येतात ते पाहून खरोखरच त्यांच्या visualization ला दाद द्यावीशी वाटते . तसेच मानवी स्वभावाचे पैलू त्यांनी कोणतीही शब्द्जंजाळता न वापरता हलक्या फुलक्या प्रसंगातून इतक्या प्रभावीपणे उघड केले आहेत कि ते एक उत्तम लेखक असल्याचे हि स्पष्ट होत.
मदन सुखात्मे एक श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या मॅनेजरचे आणि पत्नीचे अनैतिक संबंध उघड होतात . संबंध उघड झाल्याने घाबरलेली त्यांची पत्नी त्यांच्या डोक्यात बाटलीने प्रहार करते . ते मृत झालेत असे समजुन त्यांची वासलात लावण्याचा प्रयत्न केला जातो . मदन सुखात्मेची संपत्ती हस्तगत करण्याकरिता मदन सुखात्मे सारखे दिसणारे तीन तोतये मदन सुखात्मेंच्या तीन वारसांकडून (पहिली पत्नी,दुसरी पत्नी, एक दूरचे नातेवाईक )उभे केले जातात . तीन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वातून मदन सुखात्मे जिवंत असल्याचा भास निर्माण केला जातो . परंतु प्रत्येक वारसाला दुसऱ्या तोतया वारसाची कल्पना नसल्यामुळे आपणच तयार केलेला वारस नाट्य रंगवत आहे अस प्रत्येकाला वाटत .
मदन सुखात्मेची व्यक्तिरेखा साकारताना तीन तोतया व्यक्तिमत्वाचे स्वभावविशेष प्रकट करणे हे काम अत्यंत अवघड असल तरी भरत जाधव यांनी या व्यक्तिरेखा इतक्या सहजतेने साकारल्या आहेत कि… जणु तीन स्वतंत्र पात्रच काम करत आहेत इतक विश्वसनीय वाटत .
मदन सुखात्मेची व्यक्तिरेखा साकारताना तीन तोतया व्यक्तिमत्वाचे स्वभावविशेष प्रकट करणे हे काम अत्यंत अवघड असल तरी भरत जाधव यांनी या व्यक्तिरेखा इतक्या सहजतेने साकारल्या आहेत कि… जणु तीन स्वतंत्र पात्रच काम करत आहेत इतक विश्वसनीय वाटत .
मदन सुखात्मे यांना एका कपाटात ठेवून कुरिअर करण्याचा एक प्रसंग आहे. त्यात मदन सुखात्मे (भरत जाधव) कपाटात असताना त्याची समोरून प्रवेश होणे हि ट्रिक अफलातून जमून आली आहे . अशा अनेक ट्रिक्स जागोजागी वापरण्यात आल्या आहेत . केवळ ट्रिकस हे या नाटकाचे बलस्थान नाही . तर जोडीला सहयोगी पात्रांचा अभिनय , सशक्त कथा हेही आहे . मदन सुखात्मे जरी विक्षिप्त वाटत असले तरी ते व्यवहारी आहेत .त्यांना नात्यांची योग्य ओळख आहे . त्याच्या व्यवहार चातुर्यातून तो सगळ्यांचे मनसुबे उघड करतो . हे करत असताना नात्याचे योग्य भानही राखतो .
गमतीदार प्रसंगातून मानवी स्वभावाचे अंत:स्थ हेतू प्रकट करणार हे "सही रे सही " नाटक आहे .
गमतीदार प्रसंगातून मानवी स्वभावाचे अंत:स्थ हेतू प्रकट करणार हे "सही रे सही " नाटक आहे .
No comments:
Post a Comment