love triangle.... प्रेम त्रिकोण....... म्हणजे बर्म्युडा ट्रँगल सारख असत.....बाहेरुन सर्व काही ठिक वाटत.....पण आत सर्व ढवळून निघत असत . अनिश्चितता, असुरक्षितता, अविश्वासाच्या गर्तेतील या प्रेम त्रिकोणात नाती कधीही न सुटणारी गुंतागुंत निर्माण करुन स्वत:च्याच भोवती फिरत राहतात. प्रश्न असतो स्वत्वाचा , अस्तित्वाचा. "ग्रेसफुल " या नाटकातील व्यक्तिरेखांना त्यांच्या जीवनातील गरजा, दृष्टीकोन विचारात घेऊन विचार करूनच पहाव लागेल .
देव,वेदा,आभा
या तीन व्यक्तीरेखाभोवती
गुंफलेल हे त्रिकोणी कथानक
आहे.
देव,
त्याची
पत्नी आभा आणि मुलगी अस छोट
कुटुंब .आभा इंग्रजीची प्राध्यापिका एका परिघात आयुष्य जगणारी . देव
व्यवसायाने दिग्दर्शक. त्याच्या
आयुष्यात येते वेदा.
एक
बिनधास्त आतून बाहेरुन सारखीच
असलेली,आयुष्य
समरसून जगणारी अभिनेत्री.
आभाला
वाटत वेदा त्यांच्या आयुष्यात
येईपर्यंत सर्व सुरळीत होत.
देवच
तिच्याकडे दुर्लक्ष होत
नव्हतं.
तर
वेदाला देव मधली संवेदनशीलता,
बुध्दीमत्ता,
भावुकता
आभाला न उमजल्यामुळे देव
तिच्या जवळ आला अस वाटत.
त्याच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित वेदाने
आपल सर्वस्व त्याला अर्पण
केलय.
दोन्ही स्त्रिया देवची त्यांच्या आयुष्यात गरज का आहे हे एकमेकींना सांगण्याचा प्रयत्न करत निर्माण झालेला गुंता सोडविण्याचा प्रयत्न करतायेत. मानवी स्वभाव स्वार्थी असतो. त्याला अनेक वेळा नैतिकता , हक्क यांच्या मर्यादा समजतात पण सत्याचा स्वीकार करण्याची तयारी नसते.पुरुष म्हणून देवने दोन्ही हाताने सुखाला कवटाळलय. आभा त्याची सांसारिक अपरिहार्यता आहे. तर वेदा मनाशी जुळलेली तार.
आभा देवच्या विषम परिस्थितीत कायम त्याच्या बाजूने उभी असलेली, वेदाच्या त्यांच्या आयुष्यातील अनाहूत प्रवेशाने दुखावलेली ती तिच्या पध्दतीने वेदाला मानसिकरीत्या तोडण्याचा प्रयत्न करतेय. तर कधी हतबल होऊन तिचा देव तिला परत करण्याची मागणी करतेय. वेदाच्या तर तो सर्वस्वात भिनलेला त्याला वेगळ कस करणार? आभा कोणती भूमिका घेणार ? आणि देवच काय ?
कथेचा विचार करताना अस जाणवल. वेदा आणि आभा दोघीही सुशिक्षीत. देवला काय हव काय नको, त्याच्या मनाचा विचार करणाऱ्या . अगदी भारतीय परंपरेत चपखल बसेल अशी कथा. दोन्ही व्यक्तीरेखा एकमेकांवर कुरघोडी करताना त्यांच्यातली स्त्री दुबळी झाल्यासारखी वाटते. एका प्रसंगात अस वाटत की वेदातील स्व:आदर जागृत होऊन ती ठोस भूमिका घेईल . जेव्हा ती त्यांच्या नात्याबद्दल आभाला सांगितल्याच देवला सांगते, तेव्हा देव तिच्यावर ओरडतो. त्यांच्या नात्याबद्दल सांगितल्यामुळे. त्याला हे नात गुप्त ठेवायचं असत . वेदावर कधीही न रागावणारा , दुखावणारा देव अस वागतो तेव्हा वेदातील स्त्री स्वाभिमान जागा न होता ती दुबळीच दाखविण्यात आली आहे.
रंगमंचावर
दोनच पात्र आहेत. आभा-आशा
शेलार,
वेदा-अदिती
सारंगधर . देव त्यांच्या संवादातून समोर येतो.
अदिती
सारंगधर यांनी "प्रपोजल" नाटकातील उत्स्फूर्त भूमिकेनंतर
या नाटकातील व्यक्तीरेखा
साकारताना वेदाची घालमेल,
प्रेम,सरळपणा
उत्कटतेने व अतिशय सूक्ष्मपणे रंगवलीय . प्रेमातील वेडेपणा आणि प्रेमावरील निष्ठा व्यक्त करताना भूमिका अधिक गहिरी केलीय .अदिती सारंगधर कुठल्याही व्यक्तिरेखेत स्वतःला इतक्या झोकून देतात की , ती व्यक्तिरेखा अस्सल वाटायला लागते .
पतीकडून
दुर्लक्षित आभा,
प्रेम
हिरावल्यामुळे दु:खी,
हतबल
झालेली आभा,
वेदावर
मानसिक प्रहार करुन तिला जर्जर करण्याचा प्रयत्न करणारी आभा,सुडाने पेटलेली आभा , त्याचवेळी परिस्थितीच भान राखून संयत वागणारी आभा… अाशा शेलार यांनी तितक्याच प्रभावीपणे
साकार केलीय.
दिग्दर्शक -राजन ताम्हाणे .
.
No comments:
Post a Comment