आसवांनो बाहेर येऊ नका
दुबळेपण जाहीर करू नका
मनाने केला घात तरीही
दुखणे उगी मांडू नका
कळ्या कोमल उमलतील कदाचित
नाही काळ नेमका अवगत
मनाशी हितगुज हे सुरु झाले
बावरे ते परिघात कोंडलेले
रे मना ने अवकाशी अनंत
ठेवून पाय जमिनीवर निवांत
कृष्ण विवर ही व्हावे मिथ्या
वेध माझा उरू दे शाश्वत
दुबळेपण जाहीर करू नका
मनाने केला घात तरीही
दुखणे उगी मांडू नका
कळ्या कोमल उमलतील कदाचित
नाही काळ नेमका अवगत
मनाशी हितगुज हे सुरु झाले
बावरे ते परिघात कोंडलेले
रे मना ने अवकाशी अनंत
ठेवून पाय जमिनीवर निवांत
कृष्ण विवर ही व्हावे मिथ्या
वेध माझा उरू दे शाश्वत
No comments:
Post a Comment