Monday, 24 August 2015

कार्टी काळजात घुसली


        काहीवेळा दोन व्यक्तींच्या आयुष्यातील  सूर समाजसापेक्ष दृष्टीकोनातून योग्य आलापात  असले तरी , प्रत्यक्ष त्यांच्यातले सूर बिघडलेले असू शकतात . समाजाला अपेक्षित अस दिसावं   म्हणून कित्येकवेळा तडजोडी केल्या जातात . 

           आपली आवड , ध्येय यासाठी   लहानपणी पत्नी , मुल यांना सोडून गेलेला बाप , अठरा वर्षानंतर त्या बापाच्या शोधत आलेली मुलगी . बाप लहानपणी सोडून गेल्याची बोच असलेली ,  त्याच्या मायेला पारखी झालेली मुलगी यांच्यातला संघर्ष अशी "कार्टी काळजात घुसली " या नाटकाची थोडक्यात कथा आहे . 

           अनेक प्रश्न तिच्या मनात घोंगावत असतात . नाती कितीही दुरावलेली  असली तरी मुल नात्यातील बंध जपण्याचा प्रयत्न करीत असतात . त्याची उत्तर तिला हवी असतात . भाबड्या आशेपोटी किवा जगाचा अनुभव नसल्यामुळे .आतापर्यंत तिला आईची बाजू माहित असते . बाबांना भेटून त्यांचीहि बाजू तिला कळते.  

      नायक (प्रशांत दामले)  संगीताची गोडी असलेला , हास्य विनोद करणारा मोकळा माणूस …  त्याची पत्नी…  गृह्कर्तव्यदक्ष सांसारिक जबाबदाऱ्या  योग्यरीत्या पार पडणारी. त्याचे गाणे तिला ओरडणे वाटते  कलेचा आदर , स्वीकृती कुणाला नको असत . त्याला ती रुक्ष वाटते . तिच्याशी सूर जुळत नाही असे वाटते . त्यामुळे तिला सांगून तो घर सोडून जातो . पुढे संगीत दिग्दर्शक होतो . मात्र मुलीकडून त्याला तो "पळून गेलेला " अशी छाप पडलेला पती आहे अस कळत . तो तिला वस्तुस्थिती सांगतो .हे सर्व कळण्यासाठी ती मुद्दाम बेफाम,  बेफिकीर मुलीचे मुलीचे नाटक करते .

         विषय तसा गंभीर आहे . काही खुसखुशीत संवादातून वातावरण हलकफुलक करण्यात आल आहे.  प्रशांत दामले नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत आहेत. तेजश्री प्रधान यांनी आगावू मुलीच्या भूमिकेत धमाल आणली आहे . 







No comments:

Post a Comment