कविमनाचा, संवेदनशील परंतु चुकीच्या मार्गाला गेलेला भाऊ , भावाच्या चुकांवर पांघरूण घालणारी भोळी , प्रेमळ बहिण , तत्वनिष्ठ, कठोर वडील … हे कौटुंबिक नाट्य काव्यातून सादर करण्यात आले आहे.
बाळ कोल्हटकरांचे "वाहतो ही दुर्वांची जुडी " हे गाजलेले जुने नाटक. काव्यातून भावनेला हात घालून मध्यम वर्गीय प्रेक्षकांची नेमकी नस पकडत त्यांना नाटकातील प्रसंगाशी समरस करण्यात त्यांचा हातखंडा होता . …. जुनेच रूप , संदर्भ ठेऊन नाटक रंगभूमीवर परत आलय. काळाचे संदर्भ जुने असले तरी कथेतील विषय थोड्याफार फरकाने सर्व पिढ्यात दिसून येतो .
भावनिक, कौटुंबिक नाटक आज रंगभूमीवर जास्त दिसत नाहीत . कदाचित काळाचे संदर्भ , गरजा बदलल्या असाव्यात .भावनाही मोबाईलवर व्यक्त करण्याच्या जमान्यात तसेच hard rock च्या गोंगाटात हरवून गेलेल्या पिढीसमोर हे काव्यात्मक , कौटुंबिक नाटक आणण्यात विजय गोखले यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे .
अंशुमन विचारे -भाऊ , बहिण - शलाका पवार असे प्रमुख कलाकार आहेत . आपला जुना वारसा , मुल्य , ठेवा परत बघायला मिळेल कि नाही याबाबत शंका आहे . यासाठी तरी प्रेक्षकांनी हे नाटक चुकवू नये .
No comments:
Post a Comment