एक छोट सुखी कुटुंब . संध्याकाळी ६ नंतर मात्र त्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलत . दामुचे आजोबा म्हणजे श्रीमंत दामोदर पंत यांचा आत्मा दामूच्या शरीरात प्रवेश करतो . दामोदर पंत हे कडक व शिस्तप्रिय व्यक्ती असतात .
आजोबांच्या आत्म्याचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर दामूच्या शांत स्वभावात जो बदल घडतो अन त्यातून दामू (भारत जाधव) आणि त्याचे वडील यांच्यात जी जुगलबंदी सुरु होते , त्यांतून होणारी धमाल निखळ मनोरंजन करते .
आजोबांचा कडक , शिस्तप्रिय स्वभाव आणि दामूचा मुळ शांत स्वभाव यातील बदल भारत जाधव यांनी इतक्या सहजतेने पेश केला आहे की , आपण त्यांच्या अभिनय कौशल्याला दाद देऊन जातो. विजय चव्हाण यांनी दामूचे वडील म्हणून खुमासदार शैलीत या अगोदरच्या प्रयोगात काम केले होते .
एक निखळ , निकोप मनोरंजन .
No comments:
Post a Comment