माहितीचा/ज्ञानाचा
स्त्रोत धबधब्यासारखा
अंगावर कोसळत असताना नेमक
त्यातून अपेक्षित ज्ञान ओंजळीत
कस सामावून घ्यायच. पूर्वीपासून ज्ञान
म्हणून ज्याचा परिचय आपल्याला
झाला आहे,
त्यात
अध्यात्म/ परमार्थ याशिवाय अन्य अस
उपयुक्त शोधाव लागेल. उपयुक्त या शब्दाची व्याख्या सापेक्ष असली तरी , विस्तृत ज्ञानाच्या
कक्षा उपलब्ध असल्याशिवाय एखाद्या विषयाची नेमकी निवड करता येण शक्य नाही.विविध
विषय उदा.
विज्ञान,
व्यवस्थापन,
खगोलशास्त्र, गणितशास्त्र , अर्थशास्त्र याबाबत पाश्चात्य
देशात फार पूर्वीपासून विचार होत असल्यामुळे संबंधित
संज्ञा त्यांना परिचयाच्या
आहेत.
परंतु
आपल्याकडे जे साहित्य निर्माण झाले आहे , होत आहे त्यात अजूनही उपयुक्त,
वास्तववादी,वस्तुनिष्ठ
लेखनाचा अभावच आहे.
जो
भर आहे तो ललित लेखनावर. अलंकारिक
भाषा,
भाषेत
दडलेले अर्थ,
अर्थात
दडलेले विचार अस सामान्यांना
थोड अवघड असलेले दुर्बोध लिखाण
यावरच जास्त भर आहे.
त्यानंतर
पुलच्या काळात मध्यमवर्गीयांच
भाबड व्यक्तीचित्रण किंवा
पौराणिक कथा मधील व्यक्तींचे
आपल्या दृष्टीकोनातून केलेले
व्यक्तीचित्रण या पलीकडे इतर
विषयाकडे फारसे लक्ष गेलेले
नाही. अलीकडे बाळ फोंडके , निरंजन घाटे , अच्युत गोडबोले यांनी, मराठी लिखाणात अभाव असलेल्या विषयांना स्पर्श करण्यास सुरवात केली आहे .
संतसाहित्याची
जाडजाड पुस्तके वाचुन किंवा ललितलेखनातील सार शोधत बसणे आजच्या वाचकाला वेळेअभावी शक्य नाही . आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातील
तज्ञ व्यक्तीं छोटया उदाहरणामधून जीवन जगण्याच्या कलेचे
फार प्रभावीपणे चित्रण करतात.
समजायला
ही सोपे असते.आयुष्य
जगण्यासाठी दृष्टीकोन,
उद्दिष्टे,
चांगले
मित्र,
ध्येय,
स्वत:वर
विश्वास या मुलभूत गोष्टी
कशा विकसित करायच्या त्यातुन
जीवनाचा मार्ग कसा सुकर करायचा यावर लक्ष केंद्रित केल जात.
संतसाहित्यातील
वृत्ते,
अभंगाची
रचना, छंद यावर अभ्यास करुन मोजक्या
लोकांना डॉक्टरेट मिळवण्यात यश मिळाले आहे. साहित्यातील सौंदर्य शोधण्याचा
प्रयत्न करत मर्यादित लोकांपुरते ते उपयुक्त ठरले आहे . अलंकारिक
साहित्याच्या दृष्टीतून त्या अलौकीक रचना आहेत यात वाद नाही, परंतु सामान्य लोकांना आकलन
होत का?
आकलन
झाल तर त्याच समाजात आचरण दिसत
का?
प्रत्यक्ष
आयुष्य वस्तुनिष्ठपणे जगाव
लागत . का? कसे? विचारण्याची सवय
लावावी लागते. केवळ अनुभूतीवर आयुष्य जगायचे
म्हटले तर जीवनात एक प्रकारची
निष्क्रियता येईल.
आधुनिक
व्यवस्थापन गुरु , जीवनाचा
मंत्र सांगताना प्रथम स्वत:ला
सिध्द करुन दाखवित आहेत.
हे
त्यांचे वैशिष्टय विचारात
घेण्यासारखे आहे. अर्वाचीन साहित्याकडे
नजर टाकलीत तर असे लक्षात येईल
आयुष्याला भिडण्यापेक्षा
एक तटस्थ,
सुरक्षित
मार्ग अवलंबिण्यात आलेला
आहे.
वस्तुनिष्ठ
विचारांची पेरणी कमीच आढळते.
ठराविक
अक्षरांची रचना , यमके,
अलंकारिक
भाषा यांनी ते साहित्य समृध्द
असले तरी या सर्वातून सामायिक फलनिष्पत्ती, वस्तुनिष्ठतेच्या
कसोटीवर टिकणे अवघड असते .
संत रामदासांनी एक छान विचार
मांडला आहे,
आधी
संसार नेटका,
मग
परमार्थ साधावा. आधुनिक व्यवस्थापनशास्त्र नेटका संसार म्हणजे, आयुष्य कस जगाव? याबद्दल छोटया छोटया मुद्दयाद्वारे व्यक्तीमत्व विकासातून
परिपूर्ण जीवन जगण्याबाबत
सुंदर विवेचन करत.
जे
मुद्दे असतात ते समजायला,
आचरण
करायलाही सोपे असतात.
उदा.
चांगले
मित्र जोडणे ,
पुस्तके
वाचणे ,
स्वत:शी
संवाद साधणे ,
शिस्त
लावणे अशा गोष्टी प्रत्यक्ष
आचरणात आणणेही सोप आहे.
परमार्थातून एकमेकांशी संवाद साधता येईल का ? अर्थात हा ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आत्ममग्नतेच्या धुंदीत बाह्य जगताशी फारकत होण्याची शक्यता जास्त . जीवन सुंदर करण्यासाठी बाह्यस्वरूपही तितकेच महत्वाचे आहे . बाह्य जगतात पाळली जाणारी शिस्त , स्वच्छता आपले मन प्रसन्न करत नाही काय ? व्यवस्थापन शास्त्र याचे महत्व विषद करताना त्याचा थेट आयुष्य जगण्यावर कसा परिणाम होतो याची समज देते . जगणे हे , जगा
आणि जगू दया इतके साधे तत्वज्ञान आहे.
संवादाची
गरज आहे.
फक्त
अंर्तस्वरुपाशी नाही तर
बाहयस्वरुपाशी ही. ज्या माध्यमातून ते सहजपणे पोचेल,रुचेल त्याचाच सहजपणे स्वीकार केला जाईल . व्यवस्थापन शास्त्र का तर अनेक गोष्टींचा मागोवा,स्वतःचा शोध शिस्तबद्ध, नियोजनबद्ध पद्धतीने घेणे सोप जात . मराठी साहित्यात याचा अभाव असला तरी याचे महत्व तरुण पिढीला कळू लागले आहे . ती त्याकडे वळते आहे . तरुण पिढी साहित्य वाचत नाही अशी ओरड आहे . मला असे वाटत नाही . ते वाचतायेत . आधुनिक काळाबरोबर जे आवश्यक आणि ज्या माध्यमातून त्यांना वाचणे शक्य आहे, त्या माध्यमातून ते स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत . यात आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा मोठा वाटा आहे .
No comments:
Post a Comment