Wednesday, 14 October 2015

तुझ्याशिवाय




झोका  पल्याड  आत्ममग्न           …. निवांत
आसमंत  शांत , परका …     स्तब्ध
पान  आळसावलेली … सळसळायाला
संध्याकाळ  कातावलेली  ….कलाया
आकाशाचे रंग ---निस्तेज
येत एखाद पाखरू कधीतरी ….अनाहुतपणे


रात्रीच्या चांदण्यात प्रकाश …. हरवलेला
व्यक्त व्हायचं असत तरीही …… अव्यक्त
हृदयाच्या गाभ्यात किती साठलेले असतं …खोलवर
शब्द मुक्त होतात …. आसवातून
असतात सोबत … आठवणी
सर्वच  अर्थहीन …. तुझ्याशिवाय

No comments:

Post a Comment